शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

शालाबाह्य मुलांना दिला शाळेत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 01:50 IST

अतुल क्षीरसागर रावेत : शहरातील शाळाबाह्य मुलांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेतर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. झोपडपट्ट्या, बांधकामाची ठिकाणे, ...

अतुल क्षीरसागररावेत : शहरातील शाळाबाह्य मुलांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेतर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. झोपडपट्ट्या, बांधकामाची ठिकाणे, वीटभट्ट्या, खाणी या ठिकाणी जाऊन तेथील बहुतांश मुलांना शिक्षणाकडे वळविण्यात महापालिका प्रशासनाला यश आले आहे.

राज्यात बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणाची तरतूद असलेल्या कायद्याची अंमलबजावणी मागील काही वर्षांपासून सुरू आहे. त्यानुसार प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार आहे़ या भावनेने शासनाने शालाबाह्य मुलांना प्रवेश देण्याचा निर्णय दिला आहे.रावेत येथे सहगामी फाउंडेशनच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या मस्ती की पाठशाळा या शाळेतील बांधकाम मजुरांच्या शालाबाह्य दहा मुलांची रावेत येथील महापालिकेच्या शाळा क्र. ९७ मध्ये प्रवेश देण्यात आला. जन्म तारखेचा दाखला नसलेल्या सर्व शालाबाह्य मुलांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यात आले. घरची बिकट परिस्थिती, लहानांना सांभाळण्याची जबाबदारी, पालकांची शिक्षणाबाबतची अनास्था, मातृभाषेतील अडचण, पालकांमधील वाद, अशा विविध कारणांमुळे मुले शिक्षणांपासून वंचित राहू नयेत म्हणून ही मोहीम हाती घेतली आहे. मुलांच्या वस्तीमध्ये मस्ती की पाठशाला चालविली जाते. या पाठशाळेचा मुख्य उद्देश पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे व मुलांना शिक्षण देणे हाच आहे. शालाबाह्य मुलांच्या प्रवेशासाठी सहगामी फाउंडेशनच्या प्राजक्ता रुद्रवार, केतकी नायडू, रोशनी राय यांनी विशेष परिश्रम घेतले. महापालिकेच्या शिक्षण उपसभापती शर्मिला बाबर यांनी मस्ती की पाठशाळा या शाळेस भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. अशाप्रकारे मुलांना शाळेत दाखल केल्यास शिकून त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदतच होईल. शासनच्या निर्णयानुसार शाळा प्रवेशासाठी जन्मतारखेच्या पुराव्याची आवश्यकता नसल्याने मुलांच्या वयाचा अंदाज घेऊन त्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे, असे शर्मिला बाबर म्हणाल्या.शासनाच्या आरटीईच्या नियमानुसार मुलांच्या वयोगटासाठी पालकांचे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले आहे. प्रतिज्ञापत्रानुसार या १० मुलांना रावेतच्या शाळा क्रमांक ९७ मध्ये प्रवेश देण्यात आला आहे. ही सर्व मुले ६ ते १० वयोगटातील आहेत. त्यामुळे त्यांना पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गात प्रवेश देण्यात आला आहे. ही मुले नियमित शाळेला येत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद शिकण्याची प्रबळ इच्छा दाखवतो.- साहेबराव सुपे, मुख्याध्यापक,महापालिका शाळा क्र. ९७, रावेतआई-वडील एका जागी कायमचे किंवा जास्त दिवस वास्तव्य करत नसल्यामुळे बांधकाम मजुरांच्या मुलांचे शिक्षण घेण्याचे प्रमाण खूप कमी आहे. पण या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने त्यांना शिकवून प्रवाहात आणणे खूप जरुरी आहे. त्यासाठी आम्ही अशा मुलांना त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देतो. तसेच या मुलांचा जवळपासच्या महापालिकेच्या शाळेत प्रवेश करून देतो. प्रवेशानंतर मुलांना इतर मुलांसोबत शाळेत बरोबरीने अभ्यास करता यावा म्हणून त्यांना ‘मस्ती की पाठशाला’ या उपक्रमातून शिक्षणाचे धडे देत आहोत.- प्राजक्ता रुद्रवार, सहगामी फाउंडेशन,मस्ती की पाठशालाचालू शैक्षणिक वर्षात शहर परिसरात शालाबाह्य असणाºया जवळपास ७०० विद्यार्थ्यांना महापालिकेच्या विविध शाळांमध्ये शासनाच्या आरटीई नियमानुसार प्रवेश देण्यात आले आहेत. यासाठी विशेष शालाबाह्य विद्यार्थी शोधमोहीम राबविण्यात आली. शाळा परिसरामध्ये गृहभेटी, वीटभट्टी कामगार, सिग्नलवर थांबणारी मुले, बांधकाम परिसर भागात सर्वेक्षण करण्यात आले. शिक्षकांची बालरक्षक कार्यशाळा घेण्यात आली. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यात आले आहे. शाळेपासूनचे घराचे अंतर अधिक आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा पुरविण्यात आली आहे. - ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ, महापालिका

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड