शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांना फरकाची रक्कम महिन्यात देण्याचा आयुक्तांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 01:25 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेने ४६९ कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या फरकाची १६ कोटी ९ लाख ७९ हजार रुपये रक्कम कंत्राटदारामार्फत १४ वर्षांच्या ९ टक्के सरळ व्याजाने महिनाभरात द्यावी

पिंपरी : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने ४६९ कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या फरकाची १६ कोटी ९ लाख ७९ हजार रुपये रक्कम कंत्राटदारामार्फत १४ वर्षांच्या ९ टक्के सरळ व्याजाने महिनाभरात द्यावी, असा आदेश कामगार आयुक्तालयातील अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी दिला आहे. त्यामुळे महापालिकेला ३१ मार्च २०१९ पूर्वी फरकाची रक्कम आणि व्याज असे सुमारे ३७ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी आज दिली.कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायम करावे व कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, याबाबत यशवंत भोसले यांनी पिंपरी महापालिकेविरोधात २००१ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २००४ मध्ये त्यावर निर्णय झाला. त्यामध्ये कंत्राटदार बदलले, तरी कामगारांना सेवेत कायम ठेवावे. तसेच अतिरिक्त आयुक्त कामगार विभाग यांनी दिलेल्या निर्णयानुसार ‘समान काम समान वेतन’ कर्मचाऱ्यांना द्यावे. १९९८ पासून २००४ पर्यंत किमान वेतनाच्या फरकाची कर्मचाºयांची यादी व रक्कम १६ कोटी ८० लाख २ हजार २०० रुपये देण्याबाबतचेही निर्देश दिले होते.या निकालाविरोधात पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन त्यावर स्थगितीचे आदेश आणले. यानंतर सर्व कामगारांना महापालिकेने कामावरून काढून टाकले. या याचिकेवर १२ जानेवारी २०१६ ला सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवून महापालिकेची याचिका फेटाळली. त्यानंतर राष्ट्रीय श्रमिक आघाडीने या निकालाची अंमलबजावणी करावी, महापालिकेने अंमलबजावणीस चालढकल केली, असे भोसले म्हणाले. त्यानुसार अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी ५७२ कामगारांची पडताळणी केली. त्यामध्ये ४६९ कामगारांची ओळख पटली. महापालिकेने ४६९ सफाई कर्मचाºयांची १६ कोटी ९ लाख ७९ हजार रक्कम कंत्राटदारामार्फत १४ वर्षांच्या ९ टक्के सरळ व्याजाने महिन्यात द्यावी, असा आदेश दिला.>तीन महिन्यांत कर्मचारी पडताळणीन्यायालयाचा अवमान केल्याने भोसले यांनी १८ नोव्हेंबर २०१६ ला महापालिका आयुक्तांविरुद्ध उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. या याचिकेवर अनेक वेळा सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान महापालिकेने ५७२ कर्मचाºयांची पडताळणी होत नाही. फरकाची रक्कम यामध्ये तफावत वाटत आहे, असे न्यायालयात सांगितले. त्या अनुषंगाने न्यायालयाने अप्पर कामगार आयुक्त, शिवाजीनगर, पुणे यांना कर्मचाºयांची तीन महिन्यांत पडताळणी करावी, त्यांच्या वेतनाचा फरक काढावा, असे निर्देश पिंपरी महापालिका आयुक्तांना द्यावेत, असा आदेश दिला आणि राष्ट्रीय श्रमिक आघाडीची याचिका निकाली काढली.>अनेक दिवसांपासून प्रकरण प्रलंबित असल्याने काही कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला, तर काही आजारी आहेत. मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना फरकाची रक्कम मिळणार आहे. या निर्णयामुळे देशभरातील अनेक कंत्राटी कामगारांना फायदा होईल.- यशवंत भोसले, अध्यक्ष,राष्ट्रीय श्रमिक आघाडी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड