शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी स्थायी समितीच्या बैठकीस विरोधक अनुपस्थित; राष्ट्रवादी, शिवसेनेचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 20:49 IST

आंदोलन असल्याने प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात

पिंपरी : स्थायी समितीतील लाच प्रकरण उघडकीस आल्यानंतर पहिली सभा बुधवारी झाली. अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांनी सभा घेतली. सुमारे चाळीस कोटींच्या विकासकामांना मान्यता दिली. सभेस सत्ताधारी भाजपचे सदस्य सहभागी झाले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार, शिवसेनेचे एक असे पाच जणांचा अघोषित बहिष्कार असल्याचे दिसून आले.

कामाचा आदेश मिळविण्यासाठी लाच घेताना स्थायीचे स्वीय्य सहायकांसह पाच जणांना एसीबीने अटक केली होती. त्यामुळे मागील सभा झाली नव्हती. सोमवारी अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे आज स्थायी समिती सभा झाली.

आंदोलन असल्याने प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात होता. बुधवारच्या सभेच्या विषयपत्रावर २९ विषय होते. ही सभा होणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र, अध्यक्ष लांडगे सभेला दुपारी ते महापालिका मुख्यालयात आले. चौथ्या मजल्यावरील कॉन्फरन्स रुममधून त्यांनी ऑनलाइन सभा घेतली. मागील आठवड्यातील तहकूब आणि आजची दोनही सभा घेतल्या. मागच्या सभेतील एक विषय तहकूब केला.  सभेत केवळ सत्ताधारी भाजपचे नगरसेवक ऑनलाइन सहभागी झाले होते. विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या सदस्यांनी सभेवर अघोषित बहिष्कार घातला आहे.............................................गणेशोत्सव काळामध्ये विसर्जनासाठी नागरिकांच्या सोयीसाठी वाहनांवर विसर्जनाची सोय उपलब्ध करुन द्यावी, यासाठी लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून आवश्यकतेनुसार ५० पेक्षा जास्त वाहने ठेवावीत, अशा सूचना अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांनी केल्या.  .............................हल्ल्याचा निषेधठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्याचा बैठकीत निषेध केला.अशा प्रकारची घटना पिंपरी चिंचवड शहरामध्ये घडू नये याकरिता आयुक्तांना सूचना दिल्या.  अतिक्रमण कर्मचा-यांचे मनोधैर्य वाढावे याकरीता पुरेसा बंदोबस्त त्यांना पुरविण्यात यावा, अशाही सूचना केल्या.........................................विरोधीपक्षनेते राजू मिसाळ म्हणाले, ‘‘आजच्या स्थायी समितीच्या बैठकीस उपस्थित राहू नये, अशा सूचना स्थायी समिती सदस्यांना केल्या होत्या. महापालिकेतील कारभाराविरोधात आंदोलन केले.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना