शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पक्षवाढीसाठी प्रयत्न करणा-यांनाच संधी - संजय राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:59 IST

पक्षवाढीसाठी जो प्रयत्न करेल, त्यालाच संधी दिली जाईल, असे शिवसेनेचे पश्चिम महाराष्टÑ संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककार्ला : पक्षवाढीसाठी जो प्रयत्न करेल, त्यालाच संधी दिली जाईल, असे शिवसेनेचे पश्चिम महाराष्टÑ संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.कार्ला येथे झालेल्या शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या बैठकीत खासदार राऊत बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संपूर्ण राज्यात सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी फिरत असून त्यांचाच आदर्श घेऊन मावळ तालुक्यातील पदाधिकारी, शिवसैनिक यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत. आपसातील मतभेद, मनभेद, बाजूला ठेवावेत.खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत तालुक्यात जास्तीत जास्त निधी मी दिला असून, निधी देताना कुठलाच भेदभाव केला नाही. या पुढेही करणार नाही.अन्य काही पदाधिका-यांनीही मनोगत व्यक्त केले. मावळ संपर्कप्रमुख वैभव थोरात, जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख महेश केदारी, तालुकाप्रमुख राजू खांडभोर, माजी सभापती शरद हुलावळे, सल्लागार भारत ठाकूर, संघटक भूषण जगताप, लोणावळा नगर परिषदेतील विरोधी पक्षनेत्या शादान चौधरी, शिवसेनेचे सर्व नगरसेवक, युवा सेना अधिकारी अनिकेत घुले, मावळ युवा सेना चिटणीस विशाल हुलावळे, पंचायत समितीच्या माजी सदस्य आशा देशमुख, महिला संघटक शिला खत्री, लोणावळा शहरप्रमुख राहुल शेट्टी, तळेगाव शहरप्रमुख मुन्ना मोरे, लोणावळा युवा शहर अधिकारी तान्हाजी सूर्यवंशी, उपतालुका प्रमुख सुरेश गायकवाड, विभागप्रमुख अमित कुंभार, गबळू ठोंबरे, शंकर शिर्के आदी उपस्थित होते.तालुक्यात शिवसेनेचा आमदार झाला पाहिजे२०१९ चा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. म्हणून सर्वांनी तन, मन, धनाने कामाला सुरुवात करा. इतर पक्षांचा आमदार तालुक्यात होऊ शकतो तर शिवसेनाचा का नाही, ही खंत दूर करून तालुक्यात शिवसेनाचा आमदार झाला पाहिजे, असा संदेश उपस्थितांना खासदार राऊत यांनी दिला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना