शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी?

By admin | Updated: July 10, 2015 01:40 IST

खडकाळा ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी दोन्ही पॅनल्समध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

कामशेत : खडकाळा ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी भाजपा, शिवसेना, आरपीआय भारिप या पक्षाचा परिवर्तन पॅनल, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांचा दिलीप टाटिया सहकारी पॅनल एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविण्यास सज्ज झाले आहेत. दोन्ही पॅनल्सनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मनसेही या निवडणुकीत उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही पॅनल्समध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. सहा वॉर्डांतील १७ जागांसाठी निवडणूक होत आहे.या निवडणुकीसाठी परिवर्तन पॅनलने माऊलीनगर येथे मुलाखती घेतल्या. संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक माऊली शिंदे, राजाराम शिंदे, शंकर शिंदे, अशोक गायकवाड, प्रकाश गायकवाड, इंदरमल गदिया, बाळासाहेब गोरे यांनी मुलाखती घेतल्या. १००हून अधिक इच्छुकांनी मुलाखतीत उमेदवारी मागितली.तर, गणेश मंगल कार्यालयात दिलीप टाटिया सहकारी पॅनलसाठी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रोहिदास वाळुंज, आनंद टाटिया, राष्ट्रवादीचे तानाजी दाभाडे, करण ओसवाल, विलास भटेवरा, पृथ्वीराज गदिया, महेश शेट्टी, विष्णू गायखे, सुरेश वाघवले यांनी मुलाखती घेतल्या. इच्छुकांच्या समर्थकांच्या उपस्थितीने या वेळी गर्दी झाली होती. सुमारे ७० जणांनी या वेळी उमेदवारी मागितली.नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी परिवर्तनाच्या विद्यमान सदस्यांनी उमेदवारी मागितली नाही. परिवर्तनची सत्ता पलटून सत्ता मिळविण्यासाठी टाटिया पॅनलच्याही सदस्यांनी नव्या चेहऱ्यांना संधीसाठी उमेदवारी मागितली नाही. राज्यात सेना भाजपा व आरपीआयची महायुती असल्याने यंदा प्रथमच आरपीआय टाटिया पॅनलला सोडून परिवर्तनमध्ये डेरेदाखल झाला आहे. तर, टाटिया पॅनलला एसआरपीची साथ जोडली आहे. भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष बिपीन बाफना यांनी तरुणांना संधी मिळावी, अशी मागणी केली. स्वबळावर लढणाऱ्या उमेदवारांची तयारी आणि तिरंगी लढतीमुळे या वेळची निवडणूक रंगतदार होण्याची अपेक्षा जाणकार व्यक्त करीत आहेत. (वार्ताहर)