शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आयटी पार्कजवळील रस्ते खुले करा - पालकमंत्री गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 02:29 IST

हिंजवडी आयटी पार्कच्या समस्या विशेषत: वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी सकाळी परिसराची पाहणी केली. म्हाळुंगे येथून दौरा सुरूकेला होता. आयटी पार्कशी संबंधित रस्ते लवकरात लवकर तयार करून वाहतुकीसाठी खुले करणे गरजेचे आहे. त्यामुळे हिंजवडीतील वाहतुकीचा ताण कमी होईल. आयटीयन्सचा प्रवासदेखील सुखकर होईल, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.

हिंजवडी : हिंजवडी आयटी पार्कच्या समस्या विशेषत: वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी सकाळी परिसराची पाहणी केली. म्हाळुंगे येथून दौरा सुरूकेला होता. आयटी पार्कशी संबंधित रस्ते लवकरात लवकर तयार करून वाहतुकीसाठी खुले करणे गरजेचे आहे. त्यामुळे हिंजवडीतील वाहतुकीचा ताण कमी होईल. आयटीयन्सचा प्रवासदेखील सुखकर होईल, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. येथील वाहतूककोंडीबाबत ‘लोकमत’ने गेले दोन दिवस वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताची दखल घेऊन पालकमंत्री बापट यांनी पाहणी केली.सकाळी म्हाळुंगे येथील मर्सिडिझ बेन्झ-शेडगे वस्ती, शेडगे वस्ती-कुमार बिल्डर, म्हाळुंगे पूल, म्हाळुंगे पूल ते साखरे वस्ती, तसेच हिंजवडी-माण-फेज ३ रस्त्याची पाहणी व नव्याने मुळा नदीवर हिंजवडी म्हाळुंगेला जोडणाºया पुलाची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. तसेच माण-चांदे रस्त्याची देखील पाहणी त्यांनी या वेळी केली. आयटीयन्सना पार्किंगसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, यासाठी १२ हजार चौरस फूट बहुमजली इमारत बांधून त्यात आधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत. पीएमआरडीएचे किरण गित्ते यांनी हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोबाबत माहिती दिली. हिंजवडी ते बालेवाडी मेट्रोचा पहिला टप्पा असून, मार्च २०१९ पर्यंत हा टप्पा पूर्ण करण्यावर प्राधान्य देण्यात येत असून, पुढील भाग काही कारणामुळे लांबणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र मेट्रो तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे ध्येय पूर्ण करण्यात येईल, असेही ते म्हणाले.या वेळी आमदार लक्ष्मण जगताप, आझम पानसरे, जिल्हाधिकारी सौरभ राव, पीएमआरडीए आयुक्त किरण गित्ते, नगरसेवक शत्रुघ्न काटे, तहसीलदार सचिन डोंगरे, गटविकास अधिकारी स्मिता पाटील,आयटी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पै, कर्नल चरांजीत बागल, नवनाथ पारखी, राम वाकडकर, दादा मोहोळ, सुनील भरणे, श्याम हुलावळे उपस्थित होते.अभियंता दिनीच सुनावले खडे बोल!पालकमंत्री बापट म्हाळुंगे-हिंजवडी पुलाची पाहणी करत होते़ सदर पूल १४ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येणार आहे. मात्र, या पुलाचे काम सुरू असताना म्हाळुंगेच्या दिशेने जाणारा रस्ता आश्चर्यकारकरीत्या मोठ्या प्रमाणात वळवण्यात आल्याचे बापट यांच्या निदर्शनास आले. सदर बाबीची सखोल माहिती घेत असताना इंजिनिअर समाधानकारक उत्तर देत नसल्याने बापट यांनी त्यास चांगलेच धारेवर धरले. मी इंजिनिअर नसूनही माझ्या निदर्शनास आलेली ही मोठी चूक तुमच्या ध्यानी का आली नाही? अशा चुकांमुळेच अपघाताचे प्रमाण वाढेल असे, बापट या वेळी म्हणाले. या घटनेची चर्चा मात्र येथील ग्रामस्थ दिवसभर करत होते.

टॅग्स :Puneपुणे