शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवडमध्ये ‘एक गाव, एक शिवजयंती’; श्री काळभैरवनाथ उत्सव समितीचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 15:35 IST

श्री काळभैरवनाथ उत्सव समितीच्या वतीने चिंचवडमध्ये ‘एक गाव, एक शिवजयंती’ उत्सवाचे आयोजन केले आहे. या अंतर्गत चार मार्चला मिरवणूक काढण्यात येणार असून त्यात तानाजी मालुसरे, येसाजी कंक, खंडेराव दाभाडे, व्यंकोजी शिरोळे यांचे वंशज सहभागी होणार आहेत. 

ठळक मुद्देश्री काळभैरवनाथ उत्सव समितीच्या वतीने मागील तीन वर्षांपासून महोत्सवाचे आयोजनचौदा फुट उंचीच्या सिंहासनावर आरुढ शिवरायांच्या मूतीर्ची काढण्यात येईल मिरवणूक

पिंपरी : श्री काळभैरवनाथ उत्सव समितीच्या वतीने चिंचवडमध्ये ‘एक गाव, एक शिवजयंती’ उत्सवाचे आयोजन केले आहे. या अंतर्गत चार मार्चला मिरवणूक काढण्यात येणार असून त्यात तानाजी मालुसरे, येसाजी कंक, खंडेराव दाभाडे, व्यंकोजी शिरोळे यांचे वंशज सहभागी होणार आहेत. श्री काळभैरवनाथ उत्सव समितीच्या वतीने मागील तीन वर्षांपासून अखिल चिंचवडगाव शिवजयंती महोत्सव आयोजित करण्यात येतो. यावेळीही विविध कार्यक्रम होणार आहेत. शिव व्याख्यानमाला तीन मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प निलेश गावडे यांनी गड किल्ले महाराष्ट्राचे या विषयाने तर दुसरे पुष्प श्रीहरी तापकीर यांनी दक्षिणस्वारी या विषयाने गुंफले. मंगळवारी पागेची तालीम येथे मयार्देय विराजते याविषयावर श्रीनिवास कचरे, बुधवारी काकडे पार्क चौक येथे राहुल कराळे यांचे ऐसा राजा होणे नाही', गुरुवारी दळवीनगर चौकात भूषण शिंदे यांचे पराक्रमी मराठे, शुक्रवारी वाल्हेकरवाडी चौकात प्रशांत लवटे यांचे पराक्रमापलिकडील शिवराय या विषयावर व्याख्यान होईल. तर शुक्रवारी चापेकर चौकात मालोजी जगदाळे यांच्या छत्रपती थोरले शाहू या विषयावरील व्याख्यानाने समारोप होईल. दररोज सायंकाळी सात वाजता ही व्याख्याने होणार आहेत. 

चार मार्चला श्री काळभैरवनाथ मंदिर येथे दुपारी बारा वाजता शिवछत्रपतींचा जन्मोत्सव साजरा करण्यात येईल. याच दिवशी दुपारी चार वाजता श्री शिवछत्रपतींचा पालखी सोहळा काढण्यात येईल. चौदा फुट उंचीच्या सिंहासनावर आरुढ शिवरायांच्या मूतीर्ची मिरवणूक काढण्यात येईल. पारंपरिक वाद्य, मदार्नी खेळ, घोडे, वारकरी पथक, बैलगाडा, पालखी, पोतराज, हलगी वादन, ढोल-ताशा पथक असा लवाजमा या मिरवणुकीत सामावलेला असेल. विशेष म्हणजे शिवरायांच्या घोडदळातील प्रमुख सरदार असलेले तानाजी मालुसरे, येसाजी कंक, खंडेराव दाभाडे, व्यंकोजी शिरोळे यांचे वंशज यामध्ये सहभागी होणार आहेत.

रांगोळीतून साकारतेय मोडी लिपी मराठी भाषा दिनानिमित्त देऊळमळा पटांगणामध्ये छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेली पाच हजारपेक्षा जास्त जय शिवराय मोडी लिपीत या शब्दाचा वापर करून श्रुती गणेश गावडे या रांगोळी साकारत असून चाळीस बाय चाळीस फूट आकारात ही रांगोळी काढण्यात येणार आहे. मराठी भाषेच्या लेखनाची प्रमुख लिपी होती. मोडी लिपीचे संवर्धन व्हावे याकडे लक्ष वेधण्यासाठी ही रांगोळी काढण्यात येत असल्याचे काळभैरवनाथ उत्सव समितीच्या वतीने सांगितले आहे.

टॅग्स :Shivjayantiशिवजयंतीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड