कामशेत : लोणावळा येथील एकाचा मळवली कामशेत दरम्यान पाथरगावाच्या हद्दीत रेल्वेची धडक बसून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास घडली. लोणावळा लोहमार्ग पोलीस हवालदार माळवदकर यांनी दिलेल्या माहिती नुसार, नितीन जनार्धन फाळके (वय ४५, रा. वळकाई वाडी, लोणावळा) यांचा गुरुवार (दि. ११) रोजी सकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात रेल्वे गाडीची धडक बसून जागीच मृत्यु झाला असावा. हा अपघात मळवली ते कामशेत दरम्यान कि मी नं. ४१/२७ च्या जवळ झाला. या अपघाताची माहिती कामशेत रेल्वे मास्तर यांच्या कडून सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मिळाली असता घटनास्थळी जाऊन पंचनामा पूर्ण झाला. शवविच्छेदन खंडाळा येथे करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू; लोणावळ्याजवळील मळवली-कामशेतदरम्यान अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 16:53 IST
लोणावळा येथील एकाचा मळवली कामशेत दरम्यान पाथरगावाच्या हद्दीत रेल्वेची धडक बसून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास घडली.
रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू; लोणावळ्याजवळील मळवली-कामशेतदरम्यान अपघात
ठळक मुद्देरेल्वे मास्तर यांच्या कडून सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मिळाली अपघाताची माहिती शवविच्छेदन खंडाळा येथे करून मृतदेह देण्यात आला नातेवाईकांच्या ताब्यात