Akola: The murder of Shiva's youth; Murder exposed in autoconfication report! | अकोला : शिवरच्या युवकाची हत्याच; शवविच्छेदन अहवालात हत्या उघड!
अकोला : शिवरच्या युवकाची हत्याच; शवविच्छेदन अहवालात हत्या उघड!

ठळक मुद्देअज्ञात मारेकर्‍यांनी हत्या केल्याचे समोर आले आहेसिव्हिल लाइन पोलिसांनी मंगळवारी रात्री हत्येचा गुन्हा दाखल केला

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शिवर येथील रहिवासी युवक नववर्षाचे स्वागत करण्यासाठी रविवारी सकाळपासूनच मद्याच्या नशेत असताना त्याची अज्ञात मारेकर्‍यांनी हत्या केल्याचे समोर आले आहे. या युवकाचा सोमवारी पहाटे अचानक मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते होते; मात्र शवविच्छेदन अहवालात या युवकाची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले असून, सिव्हिल लाइन पोलिसांनी मंगळवारी रात्री हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
शिवर येथील रहिवासी गणेश अशोक सुरतकर (३0) हा रविवारी सकाळपासून दारूच्या नशेत होता. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात फिरत असताना रात्रीच्या दरम्यान बसस्थानक पोलीस चौकीतील एका पोलीस कर्मचार्‍याने त्यांना पोलीस चौकीत बसवून ठेवले. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. गणेश सुरतकरची पत्नी दुर्गा व शेजारी राहणारे उमेश निकम हे बसस्थानक पोलीस चौकीत सुरतकर यांना घेण्यासाठी आले. चौकीतील पोलीस कर्मचारी दाते यांनी नांेद घेऊन गणेश सुरतकर यांना ताब्यात दिल्याची माहिती सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात सांगितली. ही नोंद पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीत घेण्यात आली; मात्र रात्री उशीरा गणेश सुरतकर यांचा अचानकच मृत्यू झाल्याची माहिती बसस्थानक पोलीस चौकीतील कर्मचार्‍यांना मिळाली. त्यांनी ठाणेदार अन्वर शेख यांना माहिती दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवित गणेश सुरतकर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवरेपचार रुग्णालयात पाठविला. मंगळवारी सायंकाळी उत्तरीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यामध्ये गणेश सुरतकर यांची मारहाण करून हत्या झाल्याचे उघड झाले आहे. बसस्थानक परिसरातील एका अंड्याच्या गाडीवर गणेश सुरतकर यांना मारहाण झाल्याची माहिती असून, सिव्हिल लाइनचे ठाणेदार अन्वर शेख त्या दिशेने तपास करीत आहेत. 
 


Web Title: Akola: The murder of Shiva's youth; Murder exposed in autoconfication report!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.