शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण करून कुत्र्याचा छळ केल्याने एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 20:47 IST

कुत्र्याच्या गळ्यात दोरी बांधून छळ केला. तसेच मारहाण करून कुत्र्याचा छळ केला. त्यावेळी एका तरुणाने कुत्र्याला सोडवून त्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले

पिंपरी : कुत्र्याच्या गळ्यात दोरी बांधून छळ केला. तसेच मारहाण करून कुत्र्याचा छळ केला. त्यावेळी एका तरुणाने कुत्र्याला सोडवून त्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. कासारवाडी येथे मंगळवारी (दि. ३०) हा प्रकार घडला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करून जामीनावर मुक्तता करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलसिंग रामचंद्र घायगुळे (वय ५०, रा. कासारवाडी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कृष्णा गंगाराम जमादार (वय २०, रा. कासारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. जखमी कुत्र्यावर पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत.फिर्यादी जमादार मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घरी जात होते. त्यावेळी त्यांच्या घराच्या परिसरात वावरणाऱ्या  एका कुत्र्याच्या गळ्यात दोरी बांधून आरोपी घायगुळे त्याला ओढत होता. तसेच बांबूने मारत होता. त्यामुळे कुत्रा जखमी झाला. फिर्यादी जमादार यांनी त्या कुत्र्याला आरोपीच्या ताब्यातून सोडविले. संतोष मलिनमनी, आकाश जाधव, रोहित डिसुझा यांच्या मदतीने जखमी कुत्र्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, प्राण्यांचा छळ होत असल्याचे या घटनेवरून दिसून येत असल्याचे सांगत प्राणीमित्रांनी आरोपीला अटक करण्याची मागणी केली. त्यासाठी काही प्राणीमित्र बुधवारी (दि. ३१) दुपारपासून भोसरी पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. पोलिसांनी आरोपी बलसिंग घायगुळे याला बुधवारी अटक केली. त्यानंतर जामिनावर त्याची सुटका करण्यात आली.

टॅग्स :dogकुत्राCrime Newsगुन्हेगारीArrestअटक