शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

त्या पोलिसांची ओली पार्टी... कार्यकर्त्याने व्हिडीओ केला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 20:20 IST

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर किवळे येथे चाकण पोलिसांची व्हॅन थांबवून तुम्ही मद्य प्राशन केले आहे, अशा स्थितीत वाहन चालवू नका, असे सांगण्याचा प्रयत्न शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका सामाजिक कार्यकर्त्याने केला.

पिंपरी : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर किवळे येथे चाकण पोलिसांची व्हॅन थांबवून तुम्ही मद्य प्राशन केले आहे, अशा स्थितीत वाहन चालवू नका, असे सांगण्याचा प्रयत्न शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका सामाजिक कार्यकर्त्याने केला. पोलिसांचे वाहन थांबवून त्यांच्याशी हुज्जत घालत असल्याचे मोबाइलवर चित्रीकरण केले. त्याची व्हिडीओक्लिप फेसबुकवर व्हायरल केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात सेवेत असलेल्या पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कार्यकर्त्याविरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. योगेश मालखरे असे त्या कार्यकर्त्याचे  नाव आहे.देहूरोड पोलिसांकडे सरकारी कामात अडथळा आणल्याचा तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. काळेवाडीतील एका सामाजिक कार्यकर्त्यासह त्यांच्या अन्य साथीदारांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. महामार्गावर किवळे येथून एस्कॉर्ट ड्युटीवर जात असताना पोलीस वाहनचालक बी. के. साबळे (चाकण पोलीस ठाणे), तसेच हवालदार सोनवणे यांना कार्यकर्त्याने अडविले. बाजूला त्याची मोटार (एमएच ४६ बीबी ७३६१) थांबवली. जवळ येऊन तुम्ही आॅन ड्युटी पोलीस कर्मचारी आहात, तरीही मद्यपान करून वाहन चालवीत आहात असा आरोप केला. अशा अवस्थेत तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही. अशा भाषेत पोलिसांशी अरेरावी करू लागला. एवढेच नव्हे, तर त्याचे सहकारी या घटनेचे मोबाइलवर चित्रीकरण केले. हा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Policeपोलिसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड