शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी, अधिका-यांना आरोग्यासाठी मिळाला वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 15:45 IST

पदाधिका-यांना नागरिकांच्या आरोग्याविषयी देणे घेणे नसून अधिका-यांच्या पदोन्नतीतच रस आहे, यावर लोकमतने प्रकाश टाकल्यानंतर महापालिका पदाधिकारी आणि अधिकारी यांना वेळ मिळाला.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिका-यांना नागरिकांच्या आरोग्याविषयी देणे घेणे नसून अधिका-यांच्या पदोन्नतीतच रस आहे, यावर लोकमतने प्रकाश टाकल्यानंतर महापालिका पदाधिकारी आणि अधिकारी यांना वेळ मिळाला. आरोग्याविषयी महापौरांनी बैठक घेतली.  शहरातील स्वच्छता राखण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी योग्य नियोजन करावे अशा सूचना महापौर नितीन काळजे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिल्या. शहर स्वच्छतेबाबत पदाधिकारी व आरोग्य विभागाची बैठक  आयुक्त कक्षात झाली. त्यावेळी ते बोलत होते. मागील आठवड्यात महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. त्यावेळी अधिकारी पदोन्नतीला खोडा बसला म्हणून सभा रद्द केली होती. महापालिकेच्या सत्ताधाºयांना अधिकारी पदोन्नतीची चिंता आहे, आरोग्याचे देणे घेणे नाही, याविषयीचे वृत्त व विशेष लेख लोकमतने प्रकाशित केल्यानंतर महापालिकेला जाग आली आणि महापौरानी तातडीची बैठक घेतली.यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सिमा सावळे, पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनिता तापकीर, अपक्ष आघाडी गटनेते कैलास उर्फ बाबा बारणे, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, क प्रभाग अध्यक्षा अश्विनी जाधव , ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, फ प्रभाग अध्यक्षा साधना मळेकर, ग प्रभाग अध्यक्ष अभिषेक बारणे, ह प्रभाग अध्यक्ष  अंबरनाथ कांबळे,  नगरसदस्या सुजाता पालांडे, आशा धायगुडे-शेंडगे,  अनुराधा गोरखे, सह आयुक्त दिलिप गावडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी विजय खोराटे आदी उपस्थित होते.   पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, महापालिका परिसर व परिसरातील रस्ते यांची स्वच्छता विनाविलंब करण्यात यावी. तसेच दिवसांतून दोन वेळा कचरा उचलण्यासाठी वाहनांचे  नियोजन करण्यात यावे. याकामी आवश्यकता वाटल्यास मनुष्यबळ व वाहनांची संख्या वाढविण्यात यावी, व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी अधिकारी, कर्मचा-यांनी प्रयत्न करावेत.’’स्थायी समिती सभापती सिमा सावळे म्हणाल्या, ‘‘आरोग्य अधिका-यांनी स्वत: साईटवर जावून त्याबाबत प्रभागातील नगरसदस्यांना कळवावे. दिवसातून दोन वेळा कचरा उलण्यात यावा. यासाठी कर्मचा-यांची कार्यक्षमता वाढविण्याचे प्रयत्नही केले गेले पाहिजेत महापौर नितीन काळजे व पक्षनेते एकनाथ पवार यांनी दोन वेळा साफसफाई व कचरा उचलण्याबाबत नियोजन करावे.’’ व्यापारी परिसरामध्ये दोन वेळा साफसफाई करण्याचे व कचरा उचलण्याचे नियोजन आरोग्य विभागाने करण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी संबंधितांना दिल्या. आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, शहरातील स्वच्छतेसाठी आरोग्य निरीक्षकांनी येत्या तीन दिवसांत त्यांच्या परिसरातील स्वच्छता व कचरा उचलण्याची व्यवस्था करावी. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. दुरुस्ती अभावी कार्यशाळेत एकही वाहन राहता कामा नये. याची दक्षता अधिकाºयांनी घ्यावी. वर्दळीचे चौक व ठिकाणे निश्चित करुन तेथे स्वच्छता ठेवावी, अशा सूचना यावेळी त्यांनी  दिल्या