शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

नोईंग गांधीझम ग्लोबल फ्रेंडस लढताहेत अपप्रचारांविरुद्ध, महात्मा गांधींविषयीचे गैरसमज दूर करणारी चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 03:19 IST

देशाची फाळणी झाली ती गांधींमुळे. पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यायला लावले ते गांधींनींंच. पटेल आणि नेहरू यांच्यापैकी महात्मा गांधींनी नेहमीच पंडित नेहरूंना झुकत माप दिले. यांसारख्या अनेक अपप्रचारांमधून समाजात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जातोय. ही प्रतिमा सुधारण्यासाठी तीन वर्षांपूर्वी जनमानसामधून एक चळवळ उभी राहिली ती गांधी समजून सांगण्याची.

- नम्रता फडणीसपुणे : देशाची फाळणी झाली ती गांधींमुळे. पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यायला लावले ते गांधींनींंच. पटेल आणि नेहरू यांच्यापैकी महात्मा गांधींनी नेहमीच पंडित नेहरूंना झुकत माप दिले. यांसारख्या अनेक अपप्रचारांमधून समाजात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जातोय. ही प्रतिमा सुधारण्यासाठी तीन वर्षांपूर्वी जनमानसामधून एक चळवळ उभी राहिली ती गांधी समजून सांगण्याची. ‘नोईंग गांधीझम ग्लोबल फ्रेंडस’ या नावाने सोशल मीडियावर सुरू झालेल्या या चळवळीने अनेकांचे मतपरिवर्तन केले आहे.फेसबुकवर या चळवळीचे बारा हजार सदस्य तर व्हॉटसअ‍ॅपवर जवळपास पंधरा ग्रुप सक्रिय आहेत. हे सत्यवचनावर मार्गक्रमण करणाºया गांधीजींच्या विचारांचे एका अर्थाने फलितच!देशाला अहिंसेच्या मार्ग दाखविणाºया राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची उद्या (मंगळवारी) पुण्यतिथी! त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारी एक पिढी देशापुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी पुढे येत आहे. एकविसाव्या शतकात सोशल मीडिया हे जसे संवादाचे माध्यम म्हणून समोर आले तसेच ते अपप्रचार, गैरसमज परविण्याचेही आगार बनले. एखाद्या व्यक्तिबद्दल कुणीतरी काहीतरी सांगते आणि आपल्याला ते खरं वाटते. मग त्यांच्याबद्दल बिनधास्तपणे खोटा प्रचार सुरू होतो. अगदी ज्यांनी देशासाठी सर्वस्व अर्पण केले, त्यांनाही एका क्षणात निकाली काढले जाते. काहीही माहिती नसताना, त्याची शहानिशा न करता मेसेज पुढे पाठविले जातात आणि मग अपुºया माहितीअभावी अकलेचे तारे तोडत सुरू होते ट्रोलिंग. जनमानसात विशेषत: युवापिढीमध्ये गैरसमजाचे बळी ठरलेल्या व्यक्तींमध्ये प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल ते महात्मा गांधी यांचे. महात्मा गांधी यांनी देशासाठी दिलेले योगदान, सत्य, अहिंसा या तत्त्वांवरची त्यांची वैचारिक मांडणी याकडे दुर्लक्ष करून गांधीजींबद्दल जाणीवपूर्वक गैरसमज पसरविले जात आहेत.चर्चा आणि संवादाच्या माध्यमातून हे गैरसमज दूर व्हावेत, यासाठी ‘नोईंग गांधीजम ग्लोबल फ्रेंडस’ नावाने तीन वर्षांपूर्वी फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅपवर एक चळवळ सुरू करण्यात आली. युवकांच्या मनातील प्रश्न जाणून घेण्याबरोबरच गांधींजींबद्दल सुरू असलेल्या अपप्रचाराला विरोध या चळवळी केला जात आहे.ट्रोलिंगही रोखणार- महात्मा गांधींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर अन्याय केला. त्यांना काँग्रेसचे अध्यक्षपद सोडायला लावले. सावरकरांना महात्मा गांधींनी जाणीवपूर्वक बाजूला ठेवले, महात्मा गांधी हुकूमशहा होते, असा अपप्रचार गांधीजींबद्दल केला जात आहे, त्याचा बळी युवा पिढी ठरत आहे.- सोशल मीडियावर गांधीजींबद्दल अर्वाच्य भाषेत बोलले जाते, ट्रोलिंग केले जाते. म्हणूनच लोकांच्या मनातील गांधीजींबद्दलचे प्रश्न जाणून घेण्याबरोबरच त्याचे निरसन करणे, चर्चा घडविणे, जे सांगत आहोत त्याचे संदर्भ देणे या गोष्टी आम्ही करीत असल्याची माहिती ग्रुपअ‍ॅडमिन उमेश ठाकूर आणि गणेश चोंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.- लोकांना समजावून सांगतानाही शांत आणि विवेकी मार्गाने आम्ही गांधीजींचे विचार पोहोचवित आहोत. जमेची बाजू म्हणजे या संवादातून आज अनेकांचे मतपरिवर्तन झाले आहे. या ग्रुपमध्ये अगदी हॉटेलमधील वेटरपासून ते माजी केंद्रीयमंत्री तसेच देशविदेशासहसर्व जातीधर्मांचे लोक आहेत. त्यांना खºयाअर्थाने आज गांधी उमगले असल्याचे त्यांनी सांगितले.गांधीजींबद्दल अनेकदा टीका करायचो, विनोद करायचो, त्यांच्यावर गाणी तयार केली होती. ती म्हणायचो. गांधीजींनी देशाचे नुकसान केले हे मनात पक्के रूजले होते. लोकांशी देखील गांधीजी किती वाईट होते हे सांगून हुज्जत घालायचो. कोथरूड मध्ये राहायला गेल्यानंतर सोसायटीच्या बाहेर एका स्टॉलवर ’सत्याचे प्रयोग’ हे पुस्तक वाचनात आले. फेसबुकवरही काही लोकांना फॉलो करू लागलो, त्यातून व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकला जॉईन झालो आणि त्या ग्रुपचा आज अ‍ॅडमिनही झालो. आजही गांधी विचारांचे विरोधक आहेत. मात्र आम्ही त्यांच्याशी हुज्जत घालत नाही किंवा त्यांच्या पोस्ट डिलिटही करत नाही. उलट वैचारिकचिंतनातून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो.- गणेश चोंडे, इंटिरिअर डेकोरेटर

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीPuneपुणे