शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

'हाताला काम नाही-खायला अन्न नाही' ; कष्टकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर वाजवल्या थाळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 18:38 IST

कष्टकऱ्यांना मोफत धान्य आणि तातडीने पाच हजार रुपयांचा निधी त्यांच्या खात्यावर जमा करावा.

ठळक मुद्देकष्टकरी कामगारांना मदत द्या ..

पिंपरी : कोरोनामुळे (कोविड १९) निर्माण झालेल्या स्थितीत अंगमेहनती कष्टकऱ्यांना हाताला काम नाही आणि खायला अन्न नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कष्टकऱ्यांना मोफत धान्य आणि तातडीने पाच हजार रुपयांचा निधी त्यांच्या खात्यावर जमा करावा या मागणीसाठी कष्टकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ताटली वाजवा आंदोलन केले.        कष्टकरी शेत मजूरांच्या हाताला नाहीं काम, ताटात नाहीं अन्न, जगायचं कसं, असा प्रश्न उपस्थित कातून राज्यव्यापी ताटली सत्यागृहाला गुरुवारपासून (दि. १) सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयावर हातात ताटल्या घेवून दगड खाण कामगार, शेत मजूर व घर काम करणारे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.     प्रत्येक कामगारांना पाच हजाराचा निधी त्यांच्या खात्यावर जमा करावा. मोफत धान्य पुरवठा करावा आणि त्यांच्यासाठी मोफत भोजन योजना लागू करावी. आरोग्य विमा सुरक्षा कवच घ्यावे अशा मागण्या करण्यात आल्या. कामगारांसाठी बांधकाम कामगार कल्याण निधी, गौण खनिज विकास निधी असतो. कोविड काळामध्ये या निधीचा वापर करावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना देण्यात आले. दगडखाण असंघटित कामगार विकास परिषदेचे ऍड. बी एम रेगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कामगारांच्या प्रश्नांबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्या सरकारपर्यंत पोचविण्याचे आश्वासन दिले. मागण्या पूर्ण होई पर्यंत सत्याग्रह सुरूच राहणार असल्याचे रेगे यांनी सांगितले. कष्टकरी शेतकरी संघटनेच्या अध्यक्ष पल्लवी रेगे, सत्याग्रहाचे संयोजक सुरेश पवार, आदिनाथ चांदणे, समाधान अहिर, जनाबाई चौगुले, फुलाबाई थोरात, मरिअप्पा चौगुले या वेळी उपस्थित होते.''

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcollectorजिल्हाधिकारीState Governmentराज्य सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या