शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षात बसण्याच्या वादातून हाणामारी करणाऱ्या टोळक्यावर पिंपरीतील चिखलीत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 17:05 IST

रिक्षात बसण्याच्या वादातून रिक्षाचालक आणि त्याच्या मुलाशी वाद घालुन नंतर नऊ ते दहा जणांच्या टोळक्यासह येऊन त्यांनी बापलेकांना जबरी मारहाण केली. 

ठळक मुद्देचिखली येथे शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडली घटना निगडी पोलिसांनी आरोपींवर बेकायदा शस्त्र बाळगणे, मारामारी करणे असे गुन्हे केले दाखल

पिंपरी : रिक्षात बसण्याच्या वादातून रिक्षाचालक आणि त्याच्या मुलाशी वाद घालुन नंतर नऊ ते दहा जणांच्या टोळक्यासह येऊन त्यांनी बापलेकांना जबरी मारहाण केली. कोयत्याने वार करून त्यांना जखमी करण्याची ही घटना चिखली येथे शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश उर्फ सोन्या मोरे, जुनेद नाईकवाडे, अनिकेत प्रकाश रणदिवे, अतिश उर्फ मुन्ना बलदेव कोरी, वाजीद शेख, आक्या बॉण्ड, आदर्श उर्फ छोट्या अशोक मगर, वसीम हारुण शेख, विशाल खराते या आरोपींना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी नझीम करीमसाब शेख (वय ६४, रा. तळवडे) यांनी फिर्याद दिली आहे.शेख व त्यांचा मुलगा सद्दाम हे रिक्षाजवळ बोलत असताना अनिकेत व मन्नु उर्फ मन्या तेथे आला. त्याने रिक्षात बसण्यावरुन सद्दाम याच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यांच्यात वादंग सुरू झाले. काही वेळाने अनिकेत याने त्याच्या साथीदारांना तेथे बोलावून घेतले. अनिकेतचे साथीदार तेथे आले, धमकी देत त्यांनी सद्दाम यांच्या डोक्यात मागील बाजूस व शेख यांच्या डाव्या बरगडीवर वार केले. दोघेही गंभीर जखमी झाले. निगडी पोलिसांनी आरोपींवर बेकायदा शस्त्र बाळगणे, मारामारी करणे असे गुन्हे दाखल केले असून सहायक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :nigdiनिगडीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड