शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

निगडी-पिंपरी मेट्रो मार्गाचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीपुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 02:55 IST

महापालिका भवन ते निगडी यादरम्यान उभारण्यात येणाऱ्या मेट्रो प्रकल्पासाठी एक हजार ४८ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

पिंपरी : येथील महापालिका भवन ते निगडी यादरम्यान उभारण्यात येणाऱ्या मेट्रो प्रकल्पासाठी एक हजार ४८ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल अर्थात डीपीआर महामेट्रोने तयार केला असून महापालिकेच्या स्थायी समिती समोर ठेवला आहे.महापालिका निवडणुकीपूर्वी पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते पिंपरी या मेट्रोला मंजुरी मिळाली. मात्र, पहिल्या टप्प्यातच ही मेट्रो निगडीपर्यंत नेण्याची मागणी भाजपा, शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसे आदी राजकीय पक्षांनी केली होती. मात्र, त्यावर अधिक खर्च होणार असल्याने हा मार्ग लांबणीवर पडला होता. त्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांनी महामेट्रोला डीपीआर तयार करण्यास सांगितले. महामेट्रोने ‘सिस्ट्रा’ या आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून हा डीपीआर तयार करून घेतला आणि महापालिकेकडे सादर केला. सप्टेंबर महिन्यातच तयार झालेला हा डीपीआर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आॅक्टोबरमध्ये सादर केला.महामेट्रो आणि सिस्टाच्या अधिकाºयांनी या बाबतचे प्रेझेंटेशन महापालिका आयुक्त हर्डीकर आणि अन्य अधिकाºयांसमोरही केले आहे. हा डीपीआर स्थायी समिती सभेत मांडण्यासाठी मुहूर्त मिळाला आहे. स्थायी समितीतर्फे हा अहवाल महापालिका सभेत जाणार असून, त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारकडे तो सादर करण्यात येणार आहे.महापालिका भवन ते निगडीपर्यंत ही मेट्रो जाणार असून, या मार्गाचे एकूण अंतर ४.४१३ किलोमीटर असून, मार्गावर चिंचवड, आकुर्डी आणि निगडी या तीन ठिकाणी मेट्रो स्टेशन असणार आहे. भूसंपादन करणे आणि सेवा वाहिन्यांचे स्थलांतर करणे आदी कामासाठी १०४८.२२ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.महापालिका भवन ते निगडी अंतर ४.४१३ किलोमीटर.चिंचवड, आकुर्डी आणि निगडी हे तीन मेट्रो स्टेशन असणार.प्रकल्पाच्या कामासाठी भूसंपादन करणे आणि सेवा वाहिन्यांचे स्थलांतरासाठी १०४८.२२ कोटी खर्च

टॅग्स :Metroमेट्रोpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड