शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

निगडी ते पिंपरी : दहा मिनिटांचा प्रवास झाला तासाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 03:25 IST

निगडी ते पिंपरी मार्गावर बीआरटीचे काम सुरू आहे. त्यामुळे निगडी ते पिंपरी दहा मिनिटांचा प्रवास तासाभराचा झाला आहे. निगडी येथील उड्डाणपूल सोडले की वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो.

निगडी -  निगडी ते पिंपरी मार्गावर बीआरटीचे काम सुरू आहे. त्यामुळे निगडी ते पिंपरी दहा मिनिटांचा प्रवास तासाभराचा झाला आहे. निगडी येथील उड्डाणपूल सोडले की वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो.येथील उड्डाणपुलाखाली रिक्षाचालकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. येथे पीएमपी रस्त्याच्या बाहेर बस उभ्या करतात. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची दमछाक होत आहे. तिथून पुढे असलेल्या सिग्नलवर किमान पाच मिनिटे वाहने उभी राहतात. त्यामुळे वाहनाच्या मोठ्या रांगा लागतात. तेथून पुढे आल्यानंतर चिंचवड स्टेशन येथील दोन सिग्नलवरही हिच परिस्थिती आहे. तेथून पुढे मोरवाडी सिग्नलवर आल्यावरही वाहनचालकाला किमान पंधरा मिनिटे थांबावे लागते.नो पार्किंगचा अडथळाशहरामध्ये नो पार्किंगमध्ये वाहने लावण्याचा नवा फंडा तयार झाला आहे. त्यामध्ये चिंचवड स्टेशन येथील पोलीस स्टेशनचा समावेश आहे. या पोलीस स्टेशनसमोर अनेक वाहने उभी केली जातात. पर्यायाने रस्ता अरुंद होतो. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणी वाहने उभी करणाºयावर कारावाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. तसेच पिंपरीतही मुंबईकडे जाणाºया रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अडथळे आहेत. या ठिकाणी रस्त्यावर वाहने उभी केली जातात. त्यामुळे हा रस्ता अरुंद होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.पिंपरी-चौकात डावलले जातात वाहतुकीचे नियमपिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. या ठिकाणी बिनधास्तपणे वाहने घुसवली जातात. वाहतुकबेटाला वळसा न घालता विरुद्ध दिशेने वाहने नेली जातात. त्यातच बीआरटीमुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. वाहतुकीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे गरजेची आहे.ग्रेड सेपरेटरमधीलही वाहतूक वळवलीग्रेड सेपरेटरमधील ही वाहतूक सेवा रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. त्याचा त्रास वाहनचालकांना होत आहे. मेट्रोची कामे सुरू असल्याने ग्रेडसेपरटेर बंद करण्यात आला आहे. काही ठिकाणी अंशत: सुरू आहे. परंतु वाहने एकाच लेनमधून जात असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.ही कामे सुरू आहेत. असा प्रकारचा कोणताही दिशादर्शक फलक लावण्यात आला नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी येणाºया वाहनचालकांची तारांबळ होत आहे. अनेक वेळा मेट्रोच्या पत्र्याला धडकून अपघात होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. या ठिकाणी सूचनाफलक लावावेत अशी मागणी होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTrafficवाहतूक कोंडी