शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नीती आयोगाचा महापालिका शाळेला निधी; वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीसाठी दिले प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 03:30 IST

वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, वैज्ञानिक घडावेत, यासाठी केंद्र सरकारच्या नीती आयोगाने माध्यमिक शाळांना विज्ञान प्रयोगशाळा देण्याची योजना सुरू केली आहे. त्यामध्ये यावर्षी देशभरातील सुमारे पंधराशे शाळांमध्ये प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.

पिंपरी : वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, वैज्ञानिक घडावेत, यासाठी केंद्र सरकारच्या नीती आयोगाने माध्यमिक शाळांना विज्ञान प्रयोगशाळा देण्याची योजना सुरू केली आहे. त्यामध्ये यावर्षी देशभरातील सुमारे पंधराशे शाळांमध्ये प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव येथील महापालिकेची माध्यमिक शाळा आणि काळेवाडीतील विद्यादीप अशा दोन शाळांची निवड झाली आहे.केंद्र सरकारच्या नीती आयोगाने गेल्या वर्षीपासून माध्यमिक शाळांना विज्ञान प्रयोगशाळा देण्याची योजना सुरू केली आहे. त्यासाठी शाळांनी विज्ञान प्रकल्प उभारण्यासाठी पंधराशे चौरस फुटांची जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या योजनेत देशातील पंधराशे शाळांची निवड झाली आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील अकरा शाळांची निवड झाली आहे. त्यात दोन शाळा पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील आहेत.नीती आयोगाच्या नवीन योजनेनुसार विज्ञान प्रयोग शाळेस पहिल्यावर्षी दहा लाख रुपये मिळणार असून उर्वरित रक्कम दुसºया वर्षी मिळणार आहे. या निधीतूनसंबंधित संस्थेला प्रयोग शाळा उभारणीचे काम करायचे आहे. त्यासाठी आवश्यक ते साहित्य खरेदी करण्याचे अधिकार संस्थांना दिले आहेत. ही प्रयोग शाळा एखाद्या संस्थेत असली तरी संबंधित संस्थेबरोबरच परिसरातील अनेक शिक्षण संस्था किंवा मुले या प्रयोग शाळेचा लाभ घेऊ शकणार आहेत. सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, गणित, रोबोटिक्स आदी विषयांसाठी ही प्रयोगशाळा उपयोगात आणली जाणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव देण्यात येणार आहे.वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, वैज्ञानिक घडावेत, यासाठी केंद्र सरकारने चांगलाउपक्रम सुरू केला आहे. नीती आयोगाने निवडलेली महापालिका परिसरातील महापालिकेची पिंपळे गुरवची एकमेव शाळा आहे. विद्यार्थ्यांच्या प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम चांगला आहे. तसेच या प्रयोग शाळेत विद्यार्थ्यांना शहरातील मान्यवर कंपन्यांतील अभियंतेही मार्गदर्शन करू शकतात.मान्यवर अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना संशोधन करता येणार आहे. त्यातून वैज्ञानिक घडावेत, संशोधन व्हावे, नवनिर्मिती व्हावी, हा उद्देश आहे. या प्रयोगशाळेचा लाभ अन्य शाळांतील विद्यार्थीही घेऊ शकतात. आमच्या शाळेची निवड झाली असल्याने खूप आनंद झाला आहे. भविष्यात या प्रयोगशाळेतून चांगले प्रकल्प निर्माण करण्याचा प्रयत्न असणार आहे, असे पिंपळे गुरव येथील शाळेचे मुख्याध्यापक सुचित्रानंद वडगणे यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड