शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याचा विचार करण्याची गरज - संभाजी निलंगेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 01:36 IST

सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने मराठवाड्याचा विचार करण्याची गरज असल्याचे मत कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांनी पिंपळे गुरव येथे व्यक्त केले.

पिंपळे गुरव -  मागासलेल्या मराठवाड्यातील प्रत्येक गावातील तरुणांचा ओढा शहराकडे.., स्वातंत्र्य मिळाले तेही उशिरा.., कमी पाऊस म्हणून ओळख..., रोजगार कमी..., दुष्काळी भाग..., आदीबाबत सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने मराठवाड्याचा विचार करण्याची गरज असल्याचे मत कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांनी पिंपळे गुरव येथे व्यक्त केले. येथील निळूभाऊ नाट्यगृहात मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती व मराठवाडा जनविकास संघाने आयोजित केलेल्या ७०व्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन कार्यक्रमामध्ये निलंगेकर बोलत होते.निलंगेकर म्हणाले, ‘‘राज्यात कोळसा, तेल, इंधनाच्या अनेक खाणी आहेत. त्याचबरोबर मराठवाड्यात ज्ञानाची खाण आहे. त्यामुळे भविष्यात काही कमी पडणार नाही. मराठवाड्यातील मुलांचे यापुढे शहराकडे स्थलांतर होणारनाही. नैसर्गिक संकट येणार नाही. यासाठी दुष्काळमुक्त अभियान सुरु आहे. यासाठी मी काळजी घेणार आहे.’’क्रांतिकारक व केरळ पूरग्रस्तांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी आमदार महेश लांडगे, विभागीय आयुक्त दीपक मैसेकर, झोन चारचे पोलीस उपायुक्त प्रसाद अक्नाऊ, लातूरचे माजी आमदार शिवाजी कवेकर, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले, हभप शिवानंदमहाराज, हभप तुकाराममहाराज, हभप वाघमहाराज, माजी उपमहापौर शैलजा मोरे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, सागर अंगोळकर, बाबासाहेब त्रिभुवन, गोपाळ मळेकर, नगरसेविका उषा मुंढे, माधवी राजापुरे, शारदा सोनवणे आदी उपस्थित होत्या.भाऊसाहेब जाधव, गौतम पंडागळे, भूषण कदम, अण्णा जोगदंड, रमाकांत जाधव, शांतिलाल मुथ्था आदींना स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ यासह समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैष्णवी भोसलेच्या भारुडास व कृष्णाई केळकर यांचा महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमास रसिकांनी दाद दिली. संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संपत गर्जे यांनी सूत्रसंचलन केले. शिवाजी धोंगडे यांनी आभार मानले.तोलून-मोलून बोलामलाही खूप बोलता येते. मात्र उत्साहाच्या भरात तोलून-मोलून बोलले पाहिजे अन्यथा जाहीर माफी मागावी लागते. परिणाम भोगावे लागतात. त्यासाठी मी जाहीर भाषणातच रसिकांची माफी मागतो. कार्यकर्त्यांनी जास्त बोलण्याऐवजी ‘जयहिंद जय महाराष्ट्र’ म्हणावे, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी कार्यकर्त्यांना दिली.

टॅग्स :Marathwadaमराठवाडाnewsबातम्या