शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या नेत्यात हमरी तुमरी, माजी आमदाराच्या गाडीच्या फोडल्या काचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 19:58 IST

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भाजपाविरोधातील हल्लाबोल आंदोलन  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाले.

पिंपरी : शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भाजपाविरोधातील हल्लाबोल आंदोलन  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाले. आकुर्डीगावठाण ते तहसिल कार्यालयापर्यंत काढलेल्या रॅलीत मोटार पुढे नेण्यावरून माजी आमदार बण्णा बनसोडे आणि माजी नगरसेवक काळुराम पवार यांच्यात धुसपूस झाली होती. रॅली संपल्यानंतर चिंचवडगाव येथे गेल्यानंतर माजी नगरगसेवक पवार आणि माजी आमदार बनसोडे यांच्यात हमरी तुमरी झाली. माजी आमदार बनसोडे यांच्या मोटारीचे दगड मारल्याने नुकसान झाले. माजी उपमुख्यमंत्री शहरात असतानाच हा प्रकार घडल्याने प्रकरण मिटविण्याचे उशीरापर्यंत सुरू होते.

भाजपा सरकार शेतक-यांना कर्ज माफी देऊ शकले नाही. महागाई वाढली. नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे नागरिक त्रस्त झाले. शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचा प्रश्न, शास्ती माफी ही केवळ आश्वासनेच ठरली. भाजपा सरकार जनतेचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले. याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाला वादाचे गालबोट लागले. चिंचवडगाव पोलीस ठाण्यात माजी आमदार बनसोडे आणि माजी नगरसेवक पवार यांनी परस्परविरोधी तक्रारी देण्यासाठी धाव घेतली. मात्र राराष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांच्याकडून तक्रार न देण्याबद्दल दोघांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. ८ वाजेपर्यंत कोणाचीही तक्रार पोलिसांकडे दाखल झाली नव्हती