शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव दाभाडेत ‘नवा आदर्श घोटाळा’, इमारत पाडण्याचे तहसीलदारांचे आदेश  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 19:57 IST

मुंबई उच्च न्यायालयाने (दि.१९ जुलै २०१७) रोजी मावळ शिक्षण प्रतिष्ठानने गृहरचना संस्थेच्या जागेवर केलेल्या बांधकामावर कारवाई करुन या प्रकरणाची सखोल चौकशी करुन त्या जागेवर बांधलेल्या शाळा महाविद्यालयाच्या इमारतीची माहिती देण्याचे आदेश दिले आहे .

ठळक मुद्देतळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या शेजारीच सर्व्हे नंबर ५३४ व ५३६ क्षेत्र ४,०६६.४६ चौरस मीटर शासकीय जागा

तळेगाव :  तळेगाव दाभाडे येथे सरकारी जागेतील शासकीय निमशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या विपराव सहकारी गृहरचना संस्थेच्या ४४ गुंठे जागेपैकी २० गुंठ्यात मावळ शिक्षण प्रतिष्ठानच्या आदर्श विद्या मंदिर, कनिष्ठ महाविद्यालय तसेच सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या इमारतीचे अनधिकृतपणे बांधकाम करुन अतिक्रमण केले आहेत. शासकीय जागेत मावळ शिक्षण प्रतिष्ठानची इमारत त्वरित पडण्याचे आदेश मावळ तहसीलदार रणजित देसाई यांनी सोमवार (दि.९) रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी वैभव आवारे यांना दिले. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी इमारतीच्या अतिक्रमणाची माहिती बाहेर काढली होती.  सदरची जागा शासकीय असून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत आहे. या अनधिकृतपणे बांधलेल्या इमारतीवर त्वरित कारवाई करुन विपराव सहकारी गृहरचना संस्थेला जागा परत करावी असे निवेदन विपराव सहकारी गृहरचना संस्थेचे पदाधिकारी , कार्यकर्ते प्रदीप नाईक जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना दिले होते. त्यानंतर मावळ तहसीलदार रणजित देसाई यांनी सोमवार (दि.९) रोजी इमारत पाडण्याचा आदेश दिला.तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या शेजारीच सर्व्हे नंबर ५३४ व ५३६ क्षेत्र ४,०६६.४६ चौरस मीटर शासकीय जागा होती. त्यात शासकीय - निमशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची विपराव सहकारी गृहरचना संस्था ४४ गुंठे जागेत होण्याची नगरविकास विभागाकडे २००२ साली प्रस्ताव दिला तो मंजूर झाला. ५५ कुटुंबियांच्या गृहरचना संस्थेला मंजुरी मिळाली. २००५ साली जमिनीचे शासकीय मूल्य शासनाकडे जमा केले. त्यात २००८ -९ कालावधीत मावळ शिक्षण प्रतिष्ठानने विपराव सहकारी गृहरचना संस्थेच्या जागेत अनधिकृतपणे अतिक्रमण करुन आदर्श विद्या मंदिर, कनिष्ठ महाविद्यालय तसेच सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम केले आहे. त्यात २००८ पासून विपराव सहकारी गृहरचना संस्थेचे पदाधिकारी लढत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने (दि.१९ जुलै २०१७) रोजी मावळ शिक्षण प्रतिष्ठानने गृहरचना संस्थेच्या जागेवर केलेल्या बांधकामावर कारवाई करुन या प्रकरणाची सखोल चौकशी करुन त्या जागेवर बांधलेल्या शाळा महाविद्यालयाच्या इमारतीची माहिती देण्याचे आदेश दिले. त्यावर कारवाई करावी. त्या बांधकामासाठी परवानगी नसल्यास कायदेशीर कारवाई करण्यात यावी. नगरपरिषदेकडून त्या शाळेचा नकाशा (ब्लू प्रिंट ) मंजूर आहे का असल्यास त्याची माहिती देण्यात यावी. नसल्यास त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. सातबारा कोणाच्या नावे आहे, याची संपूर्ण सखोल माहिती आम्हाला देण्यात यावी असा आदेश दिला होता .

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसEnchroachmentअतिक्रमणSchoolशाळाAdarsh Scamआदर्श घोटाळा