नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: पिंपरी-चिंचवडमधील पुनावळे येथील एका उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटीमध्ये गुरुवारी पहाटे २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. धक्कादायक बाब म्हणजे, मृत्यूपूर्वी दोन दिवस आधी त्याने पिंपरी-चिंचवडमध्येच राहणाऱ्या आपल्या कुटुंबाला आपण कामासाठी चेन्नईला जात असल्याचे सांगितले होते, मात्र तो शहरातच वास्तव्यास असल्याचे समोर आले. इमारतीच्या २४ व्या मजल्यावरून पडून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा
वैभव दत्तात्रय सुतार (वय २५, रा. काळेवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की, पुनावळे भागातील पेठकर सियोना हाउसिंग सोसायटीतील इमारतीच्या २४ व्या मजल्यावरून एका व्यक्तीने उडी मारली आहे. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा त्याचे मित्र सौरभ तापकीर आणि हर्षवर्धन चिंचवडे यांनी त्याला रुग्णालयात नेले होते.
सौरभ तापकीर हा पुनावळे परिसरात राहतो. बुधवारी रात्री वैभव सुतार, सौरभ तापकीर आणि त्यांचे मित्र जेवणासाठी एकत्र जमले होते. वैभव हा गेल्या दोन वर्षांपासून मानसिक तणावात असल्याचे तपासात समोर आले आहे. शवविच्छेदन अहवाल पोलिसांना मिळाला असून प्राथमिक माहितीनुसार ही आत्महत्या असावी, असा संशय आहे.
वैभव याने आपल्या कुटुंबाला तो हैदराबादमधील एका आयटी कंपनीत काम करत असल्याचे सांगितले होते. काही दिवसांपूर्वी जेव्हा तो घरी परतला, तेव्हा त्याची बदली चेन्नईला झाल्याचे त्याने सांगितले होते. मात्र, हे खोटे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. प्रत्यक्षात तो मावळ तालुक्यातील चांदखेड परिसरातील त्याचा मित्र सौरभ तापकीर याच्या पोल्ट्री फार्मवर काम करत होता.
Web Summary : A 25-year-old man died after falling from a building in Punawale, Pimpri-Chinchwad. He had told his family he was going to Chennai for work but was actually in town. Police suspect suicide due to mental stress. He was working at a poultry farm.
Web Summary : पिंपरी-चिंचवड के पुनावले में एक 25 वर्षीय युवक की इमारत से गिरने से मौत हो गई। उसने परिवार को बताया था कि वह काम के लिए चेन्नई जा रहा है, लेकिन वास्तव में वह शहर में ही था। पुलिस को मानसिक तनाव के कारण आत्महत्या का संदेह है। वह एक पोल्ट्री फार्म में काम कर रहा था।