शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

माझी रिक्षा माझा परिवार अभियान,रिक्षाचालकांचे ऑनलाइन आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 14:39 IST

कोरोना काळात रिक्षा व्यवसाय अडचणीत , राज्यात 8 जणांच्या आत्महत्या

ठळक मुद्देमागण्यांच्या फलकासह उभे राहिले स्वत:च्या घरासमोर

पिंपरी : कोरोना महामारीमुळे रिक्षाव्यवसाय बंद होऊन १०० दिवस झाले. उत्पन्न ठप्प झाल्याने रिक्षाचालकांनी आत्महत्या केल्या. तरीही सरकार त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक नाही. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षाचालक अभिनव पद्धतीने ऑनलाइन आंदोलन करणार आहेत. त्यासाठी माझी रिक्षा माझा परिवार अभियान राबविण्यात येत आहे. 

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने रिक्षा व्यवसाय बंद आहे. काही मोजक्याच रिक्षा रस्त्यावर आहेत. त्यांना देखील पुरेसे प्रवासी उपलब्ध होत नसल्याने मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे इंधनाचे पैसेही दिवसभराच्या कमाईतून वसूल होत नाहीत. त्यामुळे रिक्षा चालविण्यासाठी खिशातून पैसे टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे रिक्षाचालकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून त्यांची उपासमार होत आहे. यातून नैराश्य आल्याने पुणे व पिंपरी-चिंचवडसह राज्यात आतापर्यंत आठ रिक्षाचालकांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्याग्रस्त रिक्षाचालकांच्या कुटुंबास आर्थिक मदत द्यावी, लॉकडाऊन काळात दरमहा १० हजार रुपये याप्रमाणे रिक्षाचालकांना आर्थिक मदत मिळावी,  रिक्षा व्यवसायावरील सर्व निर्बंध उठविण्यात यावेत, रिक्षाचालकांचे कर्ज माफ करावे, रिक्षावरील कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर कारवाई करावी, आदी मागण्या सरकारकडे करण्यात आल्या आहेत. त्याबाबत वेळोवेळी निवेदन दिले आहे. 

रिक्षाचालकांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत या संघटनेतर्फे माझी रिक्षा माझा परिवार अभियान राबविण्यात येत आहे. रिक्षाचालक त्यांच्या घरासमोर मागण्यांचे फलक हातात घेऊन उभे राहणार आहेत. त्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येणार आहेत. त्यामाध्यमातून सरकारपर्यंत मागण्या पोहचविण्यात येणार आहेत. या अभियानाला पिंपरी येथून बुधवारी (दि. १) सुरूवात झाली. पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे, बळीराम काकडे, साहेबराव काजले आदी या वेळी उपस्थित होते.बाबा कांबळे म्हणाले, रिक्षाचालकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. रिक्षाचालक आत्महत्या करीत आहेत. तरीदेखील सरकार गप्प आहे. त्यामुळे हे ऑनलाइन आंदोलन सुरू केले. रिक्षाचालक घरासमोर रिक्षा उभी करून परिवारासोबत फोटो काढून या अभियानात सहभागी होत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसauto rickshawऑटो रिक्षा