शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव मावळमध्ये हॉटेल व्यावसायिकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 13:25 IST

वडगाव मावळ मधील सांगवी या गावातील तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर वार करून  अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना घडली आहे. 

ठळक मुद्देवडगाव मावळमध्ये हॉटेल व्यावसायिकाचा खून ३२वर्षीय योगेश पगडे यांचा उपचाराआधीच मृत्यू, पोलीस तपास सुरु 

पिंपरी चिंचवड (वडगाव मावळ) :  वडगाव मावळ मधील सांगवी या गावातील तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर वार करून  अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना घडली आहे. वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील जुन्या भांडणाचा राग मनात धरून तसेच शेतीच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे . मयताचे भाऊ सचिन प्रभाकर पगडे यांनी वडगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे . योगेश प्रभाकर पगडे (वय 32, रा. सांगवी, ता. मावळ, जि. पुणे) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश वडगाव भागात हॉटेल व्यवसाय करीत होते. आज (शनिवार, दि. 12) सकाळी सहाच्या सुमारास वडगाव-सांगवी रोडवर योगेश गंभीर जखमी अवस्थेत पडलेले आढळले. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.  याबाबत वडगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबा शिंदे अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :mavalमावळMurderखूनCrimeगुन्हाbusinessव्यवसाय