शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धुणीभांडी करणाऱ्या महिलेला घरी येण्यास हाेत हाेता उशीर ; पतीने केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 14:51 IST

धुणीभांडी करणाऱ्या महिलेला घरी येण्यास उशीर हाेत असल्याचा राग मनात ठेवून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपळेगुरव येथे घडली आहे.

पिंपरी : धुणीभांडी करणाऱ्या महिलेला घरी येण्यास नेहमीच उशीर होत असे. त्यावरून  पती-पत्नीमध्ये  वाद होत असत. सोमवारी पहाटे  सव्वाचारच्या सुमारास असाच वाद होऊन त्यात पतीने कोयत्याने वार करून पत्नीचा खून केला. पिंपळेगुरव येथे  ही घटना घडली. सांगवी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैला हनुमंत लोखंडे (वय 40) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. हनुमंत बाबुराव लोखंडे वय 58 असे पोलिसांनी अटक केलेल्या पतीचे नाव आहे. शैला या धुणी-भांड्याचे कामे करीत होत्या. कामावरून घरी येण्यास त्यांना नेहमीच उशीर होत असे. त्यावरून शैला आणि पती हनुमंत यांच्यात भांडण होत असे. सोमवारी पहाटे चारच्या सुमारास शैला व हनुमंत यांच्यात भांडण सुरू होते. यावेळी हनुमंत याने शैला यांच्यावर कोयत्याने वार केले. यात शैला यांचा मृत्यू झाला. भांडण सुरू असताना शैला व हनुमंत यांचा आरडाओरडा सुरू होता. तो ऐकून वरच्या मजल्यावरील सावत्र मुलगा खाली आला. त्याने खिडकीची काच फोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी शैला या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. मुलाने त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी आरोपी पती याला ताब्यात घेतले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMurderखूनCrime Newsगुन्हेगारी