शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मानलेल्या बहिणीवर अत्याचार केल्याने तरुणाचा खून; वाकड येथील घटना

By नारायण बडगुजर | Updated: April 10, 2024 23:54 IST

वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित लोकेंद्र यांची मानलेली बहीण आणि निकेतकुणाल सिंह हे एकाच कंपनीत नोकरीला होते.

पिंपरी : मानलेली बहीण नशेत असताना तिच्या कंपनीतील सहकाऱ्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याचा राग आल्याने भावाने वीट डोक्यात घालून बहिणीच्या सहकाऱ्याचा खून केला. वाकड येथील भूमकर वस्तीत शुक्रवारी (दि. ५) ही घटना घडली. 

निकेतकुणाल विजयकुमार सिंह (२८, रा. भुजबळवस्ती, वाकड), असे खून झालेल्याचे नाव आहे. लोकेंद्र किशोरसिंह (२८, रा. वाकड, मूळ रा. राजस्थान) या संशयिताच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर झोल यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. १०) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित लोकेंद्र यांची मानलेली बहीण आणि निकेतकुणाल सिंह हे एकाच कंपनीत नोकरीला होते. दरम्यान, ३ एप्रिल रोजी रात्री त्यांच्या कंपनीतील सहकारी पार्टीसाठी एकत्र आले. लोकेंद्रच्या बहिणीला नशा जास्त झाल्याने ती निकेतकुणाल याच्या फ्लॅटवर थांबली. त्यावेळी निकेतकुणाल याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत तिने तिचा मानलेला भाऊ लोकेंद्र याला माहिती दिली. 

याबाबत जाब विचारण्यासाठी लोकेंद्र वीट घेऊन निकेतकुणाल याला मारण्यासाठी त्याच्या फ्लॅटवर गेला. तेथे दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी लोकेंद्र याने निकेतकुणाल याच्या डोक्यात वीट घातली. यामध्ये जखमी झालेल्या निकेतकुणाल याला रुग्णालयात दाखल केले. उपचार केल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस