पिंपरी : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक घनश्याम खेडकर यांच्या पुतण्याचा खून झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. राजेंद्र दिगंबर खेडकर (वय ३० , रा. च-होली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देहू फाटा येथे मंगळवारी (दि. ३ जुलै) दुपारी बाराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तरुणाच्या शरीरावर जखमा आहेत. अज्ञात इसमांनी खून केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दिघी पोलीस तपास करत आहेत.
दिघीत माजी नगरसेवकाच्या पुतण्याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 16:26 IST