शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

लेटलतिफांना महापालिका आयुक्तांचा दणका : आठ अधिकाऱ्यांना सक्त ताकीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 13:49 IST

प्रशासकीय बैठकांना अनुपस्थित राहण्याची अधिकाऱ्यांची मानसिकता वाढली आहे...

ठळक मुद्देसहायक आयुक्त, आरोग्य अधिकारी, उद्यान अधीक्षकांवर कारवाईप्रशासकीय कारभारात सुसूत्रता, गतिमानता आणि शिस्त राहावी याकडे आयुक्त हर्डीकर यांचा कटाक्ष

पिंपरी : महापालिकेत वेळेत हजर न राहणाऱ्यांविरोधात आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत आयोजित बैठकीला उशिरा आलेल्या आठ अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे. त्यामध्ये दोन सहायक आयुक्त, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, मुख्य उद्यान अधीक्षक, कार्यकारी अभियंता, मुख्य अग्निशामक अधिकारी, प्राचार्यांचा समावेश आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत सुसज्ज जीवनमानाबाबत १५ जूनला सकाळी अकराला आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. शहराच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक असल्याने सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहावे, अशा सूचना आयुक्तांनी केल्या होत्या. असे असतानाही हे अधिकारी नियोजित बैठकीस वेळेवर उपस्थित राहिले नाहीत. गैरहजर राहून त्यांनी कार्यालयीन शिस्तीचा भंग केला आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सहायक आयुक्त स्मिता झगडे, अण्णा बोदडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे, मोरवाडीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पूर्वकल्पना देऊनही बैठकीस उशीर करणे, गैरहजर राहून कार्यालयीन शिस्तीचा भंग केला आहे. त्यामुळे आयुक्तांनी लेटलतीफ अधिकाºयांची १५ जूनची अर्ध्या दिवसाची किरकोळ रजा कापली आहे. तसेच कार्यालयीन कर्तव्यात कसूर केल्यास नियमाधीन कारवाई करण्याची सक्त ताकीद देण्यात आली......बेशिस्त अधिकाऱ्यांना चपराक प्रशासकीय बैठकांना अनुपस्थित राहण्याची अधिकाऱ्यांची मानसिकता वाढली आहे. कारणे सांगून अनुपस्थित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रशासकीय कारभारात सुसूत्रता, गतिमानता आणि शिस्त राहावी यासाठी आयुक्त हर्डीकर यांचा कटाक्ष असतो. त्यामुळे महापालिकेच्या वेळेवर कामावर न येणाऱ्यांविरोधात महापालिका आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे लेटलतीफांना चपराक बसली आहे. 

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshravan hardikarश्रावण हर्डिकर