शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प म्हणजे फाजीलपणा  : माजी आयुक्त महेश झगडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 15:31 IST

हा अर्थसंकल्प नसून निरक्षरांनी सादर केलेली ती आकडेवारी अर्थसंकल्पाचा पायाच पूर्णपणे विकृतपणाचा!

ठळक मुद्देवर्गीकरणाचे प्रस्ताव टाळणे हा निर्णय स्वागतार्ह अर्थसंकल्पाचा पायाच पूर्णपणे विकृतपणाचा!

पुणे : पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प म्हणजे फाजीलपणा असून, हा अर्थसंकल्प नसून निरक्षरांनी सादर केलेली ती आकडेवारी आहे. या अर्थसंकल्पाचा पायाच पूर्णपणे विकृतपणाचा आहे, अशा शब्दात महापालिकेचे माजी आयुक्त महेश झगडे यांनी, पालिका आयुक्तांनी सादर केलेल्या सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पावर भाष्य केले. महापालिकेकडे जुनी कामे पूर्ण करण्यासाठी २० ते २२ हजार कोटी रुपयांचे दायित्व असताना, यंदाचा अर्थसंकल्प हा पोरखेळपणाचा ‘पार्ट २’ असल्याचेही ते म्हणाले. सजग नागरिक मंचच्यावतीने, ‘पुणे मनपाच्या प्रस्तावित अर्थसंकल्पाचे विश्लेषण (२०२०-२१)’ या विषयावर महेश झगडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर, कार्यकारी विश्वस्त जुगल राठी यावेळी उपस्थित होते. झगडे म्हणाले, महापालिकेचा अर्थसंकल्प हा राज्य शासनाच्या नियमावली व संकेतानुसार होणे अपेक्षित असते. मात्र ‘आयएएस’ अधिकाºयांकडून मांडला गेलेले हा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या सदस्यांप्रमाणेच फुगविलेला आहे. गेल्या तीन वर्षांची उत्पन्नाची सरासरी पाहूनच अर्थसंकल्पात जमा बाजू दाखविणे, असे संकेत असताना फाजील उत्पन्न वाढ दाखवून ६ हजार २२९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. जमेच्या बाजूत कुठलाही विचार केला गेलेली नाही. बेरजेचे गणित जमत नसलेली व्यक्ती आयुक्त कशी झाली, असा प्रश्न आता पुणेकरांनी विचारला पाहिजे. हा अर्थसंकल्प म्हणजे पुणेकरांवर अत्याचार आहे. आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यावर त्या वर्षाचा लेखा-जोखा का दिला जात नाही, असा प्रश्नही यावेळी झगडे यांनी उपस्थित करून प्रशासनाच्या कारभारावर शंका उपस्थित केली. पुणे महापािलकेला पुरस्कार मिळविण्याचा एक मानसिक रोग झाला असून, पुरस्कार मिळाल्याचे दाखविणे म्हणजे नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. कचरा व्यवस्थापन करण्यापेक्षा स्वच्छ सर्व्हेक्षणावर जास्त खर्च करण्यास पालिकेला रस आहे.शहर विकासाच्या रक्तवाहिन्या असलेला विकास आराखड्याबाबत या अर्थसंकल्पात एक शब्दही नाही. ज्या शहरी गरीब योजनेवर शंभर कोटीहून अधिक खर्च होतो. त्या योजनेचा लाभ किती जणांनी घेतला, याचा साधा उल्लेखही अर्थसंकल्पात नाही. त्यामुळे ही योजना केवळ शहरातील खासगी हॉस्पिटल मोठी करण्यासाठी राबविली जात आहे का, अशी शंका येत आहे. आरोग्य योजनांचे खासगीकरण हे पुणेकरांसाठी मोठे दुर्दैव असून, पालिकेच्या आरोग्य विभागाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले......वर्गीकरणाचे प्रस्ताव टाळणे हा निर्णय स्वागतार्ह महापालिकेच्या अर्थसंकल्पावर टीका करताना महेश झगडे यांनी, सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात वर्गीकरणाचे प्रस्ताव टाळण्याबाबचा जो निर्णय घेतला आहे. तो अतिशय स्वागतार्ह असल्याचे सांगितले. हे सांगतानाच त्यांनी वर्गीकरण टाळण्याचा विषय अर्थसंकल्पाच्या प्रारंभी ठळक अक्षरात दिला असल्याने, तो नवनियुक्त आयुक्तांचा असल्याचा अंदाज व्यक्त करीत नवनियुक्त आयुक्तांकडून कारभारातील बदलांसह ते चांगले काम करतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBudgetअर्थसंकल्पPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका