शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

मुंबई-पुणे महामार्ग : थांबणाऱ्या वाहनांमुळे अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 03:08 IST

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर थांबणारी अवजड वाहने, अपघातग्रस्त वाहने, तसेच बंद पडलेल्या नादुरुस्त वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण होत आहे. वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होऊन अनेकांचे बळी जाण्याच्या घटना घडत आहेत. रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने तसेच अपघातग्रस्त वाहने वेळेवर बाजूला न केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, अपघातासही कारणीभूत ठरत आहेत.

कामशेत : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर थांबणारी अवजड वाहने, अपघातग्रस्त वाहने, तसेच बंद पडलेल्या नादुरुस्त वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण होत आहे. वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होऊन अनेकांचे बळी जाण्याच्या घटना घडत आहेत. रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने तसेच अपघातग्रस्त वाहने वेळेवर बाजूला न केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, अपघातासही कारणीभूत ठरत आहेत.जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर ठिकठिकाणी रस्त्यावर तसेच रस्त्याच्या बाजूला मोठी अवजड वाहने रांगेत उभी असतात. महामार्गाशेजारी असणा-या हॉटेल, ढाबा व इतरत्र थांबलेल्या या वाहनांची संख्या अधिक असते. या वाहनांमुळे महामार्गावरून धावणाºया इतर वाहनांसाठी रस्ता अरुंद होतो, रस्त्याचा अंदाज येत नाही. विशेषत: या थांबलेल्या वाहनांमुळे दुचाकीस्वारांसाठी मोठी अडचण निर्माण होत असून, अपघात होत आहेत. याकडे रस्ते महामंडळ व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे महामार्गावर प्रवासादरम्यान आजपर्यंत अनेकांचे निष्कारण बळी गेले आहेत.महामार्गावर थांबलेल्या वाहनांवर दुसरे एखादे वाहन धडकून एखादा अपघात झाला की ही वाहने बाजूला केली जातात. तसेच नादुरुस्त वाहने भर रस्त्यावर उभी राहत असून येथे कोणत्याही प्रकारच्या सूचना अथवा फलक लावले जात नाहीत. वाहनाच्या मागील बाजूस एखाद्या झाडाची फांदी लटकावून ठेवली जाते. मात्र क्रेन अथवा इतर मार्गाने ते वाहन रस्त्यामधून बाजूला केले जात नाही.याचप्रमाणे महामार्गाच्या साईड पट्ट्यांवर उभ्या असलेल्या अवजड वाहनांमुळे इतर वाहनचालकांना त्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते. यातूनही अनेकदा किरकोळ अपघात घडत असतात. कामशेतमधील पवनानगर फाटा येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील वाहतूक सेवारस्त्याने वळविण्यात आली आहे. या सेवारस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी अनेक अवजड व इतर वाहने उभी असतात. अगोदरच अरुंद असलेला सेवारस्ता त्यामुळे आणखी अरुंद होत असून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. यातूनच किरकोळ व मोठे अपघात नेहमीच घडत असून या चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात नाही.

टॅग्स :Mumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेPuneपुणेnewsबातम्या