शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सैल दरडी हटविण्याच्या कामाला पुन्हा सुरुवात; ६५ कोटी खर्च अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 16:32 IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटातील दरडप्रवण क्षेत्र असलेल्या खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगद्याजवळील धोकादायक व सैल झालेले दगड व माती हटवून त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्याचा मोहिमेला पुन्हा सुरुवात झाली आहे.

लोणावळा : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटातील दरडप्रवण क्षेत्र असलेल्या खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगद्याजवळील एक किलोमीटर अंतरामध्ये डोंगरावरील धोकादायक व सैल झालेले दगड व माती हटवून त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्याचा मोहिमेला पुन्हा सुरुवात झाली आहे. या कामाकरिता खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगद्यापर्यंत मुंबईकडे जाणारी एक लेन बंद ठेवण्यात आली आहे. एक्सप्रेस वेवरील दरडप्रवण क्षेत्रातील खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगदा, अमृतांजन पूल, आडोशी बोगदा, भातन बोगदा येथील एकूण दोन किलोमीटर अंतरावरील  धोकादायक सैल दरडी हटविणे व  संरक्षक जाळ्या बसविण्यात येणार असून, या दरड हटाव मोहिमेचा कालावधी दीड वर्षाचा आहे. या कामासाठी अंदाजे ६५ कोटी खर्च अपेक्षित असल्याचे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाºयांनी सांगितले.दोन वर्षांपूर्वी २२ जून व १९ जुलै २०१५ रोजी पुणे मुंबई एक्सप्रेस वरील खंडाळा (बोरघाट) घाटातील खंडाळा व आडोशी बोगद्याच्या तोंडाजवळ मोठ्या दरडी कोसळल्या होत्या. दरडीच्या या नैसर्गिक दुर्घटनेत आडोशी बोगदा येथे तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले होते. आडोशी बोगद्याच्या दरडीच्या अगोदर २२ जूनला खंडाळा बोगद्याजवळही मोठी दरड कोसळली होती. या घटनेत दोन वाहनांची नुकसान वगळता कोणतीही जीवितहानी झाली नव्हती, दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. या दोन्ही घटनेसह अवघ्या दीड महिन्यात खंडाळा घाटातील खंडाळा एक्झिट ते आडोशी बोगद्या पर्यंतच्या आठ किलोमीटर अंतरावर पाचवेळा दरडीच्या घटना घडल्या होत्या. यामुळे घाटमाथा परिसरात एक्सप्रेस वेवरून प्रवास करणे धोकादायक बनले होते. खंडाळा घाटातील आठ किलोमीटर अंतरावरील दरडप्रवण क्षेत्रात कोणत्याही क्षणी दरड कोसळेल अशी भीती प्रवाशांमध्ये पसरल्याने यामार्गावरून प्रवास करणे असुरक्षित बनले होते. सातत्याने कोसळणा?्या दरडीमुळे एक्सप्रेस वेवरील वाहतूक अनेक दिवस विस्कळीत झाली होती. त्यानुसार घाटमाथा परिसरातील डोंगर पठारावरील अत्यंत धोकादायक दरडीच्या ठिकाणांची भूवैज्ञानिक तज्ज्ञांच्या मार्फत पाहणी केली होती. त्यांच्या पाहणी अहवालानुसार खंडाळा एक्झिट ते आडोशी बोगद्या पर्यंतच्या आठ किलोमीटर अंतरावरील एकूण आठ ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. या आठ ठिकाणी सैल झालेल्या दरडी व त्या ठिकाणी पुन्हा दरडी कोसळू नये यासाठी डोंगर पठारावर संरक्षक जाळ्या बसविण्याच्या कामाला गतवर्षी २७ जुलै २०१६ रोजी सुरुवात करण्यात होती. या कामाला एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लागला आहे. त्याकामासाठी सुमारे ५२ कोटी खर्च करण्यात आला आहे. हे काम मेकाफेरी कंपनीने स्पॅनिश व इटलीच्या तज्ज्ञ कामगारांच्या मदतीने पूर्ण केले आहे. मात्र तंज्ञाना निश्चित केलेल्या ठिकाणा शिवाय इतर ठिकाणी दरडीचा धोका निर्माण झाला असल्याचे निदर्शनास आल्याने त्याबाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात संबंधितांनी सूचित केले होते. त्यानुसार एक्सप्रेस वेवरील घाटमाथा परीसरातील दरडप्रवण क्षेत्रातील धोकादायक सैल दरडी हटविणे व संरक्षक जाळ्या बसविण्याच्या मोहिमेला पुन्हा सुरुवात झाली आहे. यामध्ये चार ठिकाणावरील सैल झालेल्या दरडी हटविणे व त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्यात येणार आहे. याकामासाठी सुमारे ६५ कोटी रुपये खर्च होणार असून, पायोनिअर फाऊंडेशन इंजिनिअर प्रा. लिमिटेड ही कंपनी सदरचे काम करत आहे. 

कामादरम्यान प्रवाशांनी सहकार्य करावे : प्रशांत औटी पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरील दरडप्रवण क्षेत्रात धोकादायक दरडी हटविणे व संरक्षक जाळ्या बसविण्याच्या कामाला रस्तेविकास महामंडळाच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. कामादरम्यान सुरक्षेसाठी कामाच्या ठिकाणची एक लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. जसजसे काम होईल, तशी बंद करण्यात आलेली लेन पुन्हा वाहतुकीसाठी खुली करण्यात येईल. कामाच्यावेळी होणा?्या गैरसोयी बद्दल प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रस्ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता प्रशांत औटी यांनी केले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड