शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

निगडीपर्यंत मेट्रोच्या मागणीसाठी विविध संघटनांचे आंदोलन, खासदार, आमदार, नगरसेवकांनी लावली हजेरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 17:35 IST

मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात रविवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

पिंपरी  - मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात रविवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणात शहरातील विविध सामाजिक संघटनांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. 

लाक्षणिक उपोषणात  पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ), पोलीस नागरिक मित्र महाराष्ट्र राज्य, ग्राहक पंचायत पिंपरी-चिंचवड, जलदिंडी प्रतिष्ठान पुणे, आस्था सोशल फाउंडेशन, भावसार व्हिजन ‘इ’ पिंपरी-चिंचवड, रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी, स्वातंत्र्य वीर सावरकर मंडळ, एसबीआय पेन्शनर असोसिएशन, माउली ज्येष्ठ नागरिक संघ आकुर्डी, फेडरेशन आॅफ घरकुल, सस्कार प्रतिष्ठान पुणे, कै. तुकाराम तनपुरे प्रतिष्ठान आदी संघटनांनी सहभाग घेतला. 

 मावळ मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शेजला मोरे, नगरसेवक अमित गावडे, शिवसेनेचे पालिकेतील गटनेते  राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे नेते  नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेवक सचिन चिंचवडे, नगरसेवक राजू मिसाळ, नगरसेवक उत्तम केंदळे, नगरसेवक सचिन चिखले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेना पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख योगेश बाबर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश  संघटक विशाल काळभोर, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, संजय लंके,अमोल भोईटे, सामाजिक कार्यकर्ते गुलाब सोनवणे आदींनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दिला. 

पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत असावी, या मागणीसाठी पिंपरी-चिचंवड सिटीझन फोरमच्या सदस्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन वेळा भेट घेतली. मात्र मुख्यमंत्र्यांनी याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. पालकमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात पुणे मेट्रो निगडीपर्यंत जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले, त्यामुळे नागरिकांची मोठी निराशा झाली आहे. पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यासाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ) व अन्य संघटनांच्या वतीने मागील दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याने आणखी पाठपुरावा केला जाणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMetroमेट्रो