शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या पिंपरी दौऱ्यात मराठा क्रांती मोर्चाची निदर्शनं, 20 कार्यकर्ते ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 13:52 IST

मराठा आरक्षणासह प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने

पिंपरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पिंपरी चिंचवड दौऱ्यादरम्यान सोमवारी (23 जुलै) चिंचवड येथे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी निदर्शने केली. मराठा आरक्षणासह प्रलंबित मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली. यावेळी पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या २० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सकाळी साडेदहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. 

मराठा आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने मुख्यमंत्र्यांबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. क्रांतीवीर चाफेकर स्मारकाच्या भूमिपूजन समारंभानिमित्ताने मुख्यमंत्री शहर दौऱ्यावर आले आहेत. मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यावेळी आंदोलन करणार असे पत्रक पिंपरी-चिंचवड शहर मराठा क्रांती मोर्चाने रविवारी काढले होते. चिंचवडच्या लोकमान्य हॉस्पिटलसमोर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जोरदार निदर्शने केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करण्यात आला. या मोर्चानंतर मराठा समाजातील २० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी घोषणाबाजी करण्यात आली. सतीश काळे, नकुल भोईर, सुधीर उंडे, रसीद सय्यद,  मारुती भापकर, ज्ञानेश्वर लोघे, विनायक जगताप,अक्षय बुंदील, प्रकाश जाधव, गणेश कोकाटे, वैभव जाधव अशी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत.

'या' आहेत मराठा समाजाच्या मागण्या 

- मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे.

-  मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.

- राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठ्यांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अध्यादेश काढून त्यांचे त्वरित कायद्यात रुपांतरण करावे.

- अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेअंतर्गत कर्ज देण्यासाठी बँकाना सक्तीचे आदेश द्यावेत.

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड