शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारी टोळी करून वर्चस्व व आर्थिक फायद्यासाठी तब्बल १८ गुन्हे करणाऱ्यांवर मोकाची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 12:06 IST

आरोपी यांनी टोळी करून वर्चस्वासाठी विविध प्रकारचे केले गुन्हे तसेच घरकुल व चिखली परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न.

ठळक मुद्देपांग्या जाधव, आक्या बॉन्ड टोळीवर मोकाची कारवाई; दोन अल्पवयीन जणांचा समावेश

पिंपरी : गुन्हेगारी टोळी करून वर्चस्व व आर्थिक फायद्यासाठी विविध प्रकारचे १८ संघटीत गुन्हे करणाऱ्या पांग्या जाधव व आक्या बॉन्ड टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियत सन १९९९ (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली. सहा जणांच्या या टोळीत दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. टोळी प्रमुख विकास ऊर्फ पांग्या धोंडीराम जाधव (वय २२, रा. शरदनगर, चिखली), आकाश ऊर्फ सुमित ऊर्फ आक्या बॉन्ड पांडुरंग मोहोळ (वय १९, रा. घरकुल, चिखली), शोएब इजराईल शेख (वय १९, रा. घरकुल, चिखली), विशाल रामधन खरात (वय २०, रा. ओटास्किम, निगडी) यांच्यासह अन्य दोन अल्पवयीन आरोपींवर पोलिसांनी मोकाची कारवाई केली.आरोपी यांनी टोळी करून वर्चस्वासाठी विविध प्रकारचे गुन्हे केले. तसेच आर्थिक फायद्यासाठी देखील गुन्हेगारी कृत्य केले. घरकूल व चिखली परिसरात त्यांच्याकडून दहशत पसरविण्यात येत होती. त्यामुळे त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे चिखलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी सांगितले.पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईबाबतचा प्रस्ताव तयार केला. पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे यांनी प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता केली. त्यानंतर सोमवारी (दि. १०) अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी हा प्रस्ताव मंजूर करून त्याबाबतचा आदेश पारीत केला. पोलीस कर्मचारी सचिन चव्हाण व दत्ता कदम यांनी प्रस्ताव तयार करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस