शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमातून मुली झाल्या बेपत्ता, पिंपरीत दोन तर भोसरीमध्ये घडली एक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 01:36 IST

अपहरण : पिंपरीत दोन तर भोसरीमध्ये घडली एक घटना

पिंपरी : पिंपरीतून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले आहे, तर पिंपरीतील भाटनगर येथून १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भोसरीतून १६ वर्षांच्या मुलीला कोणीतरी अज्ञाताने फूस लावून पळवून नेले आहे. दोन दिवसांत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या तीन घटना घडल्या असून, भोसरीतून एका १६ वर्षांच्या मुलाचेसुद्धा अज्ञाताने अपहरण केले आहे. एकाच वेळी घडलेल्या अपहरणाच्या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतून मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फूस लावून १७ वर्षांच्या मुलीला पळवून नेले, तर भाटनगर येथे गॅस सिलिंंडरचे वाहन आले, ते पाहण्यासाठी घराबाहेर पडलेली १७ वर्षांची तरुणी पुन्हा घरी परतली नाही. कोणीतरी तिला आमिष दाखवून पळवून नेले आहे. ही मुलगी महिला मंडळ संचालित स्वाधार केंद्रात राहण्यास होती. कोणीतरी अज्ञाताने तिला फूस लावून पळवून नेले आहे. दापोडीतील सरस्वती अनाथाश्रमातून मंगळवारी १२ वर्षे वयाच्या मुलाचे अपहरण झाले आहे.अपहरणाच्या वाढत्या घटनांमध्ये परिसरामध्ये चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांनी आरोपींचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी परिसातील नागरिकांमधून होत आहे.बेपत्ता होण्याचे वाढले प्रमाणआश्रमात वास्तव्यास असलेल्या मुली सद्य:स्थितीत सुरक्षित नसल्याचे निदर्शनास आले आहे. दोन महिन्यांपूर्वी भोसरीतील शासकीय वसतिगृहातून दोन मुली बेपत्ता झाल्याची घटना घडली. त्यानंतर चिंचवडगावातील गुरूकुल या आश्रमातून दोन मुली बेपता झाल्याची घटना घडली आहे. आता अपहरण झालेल्या दोन मुली दोन वेगवेगळ्या आश्रमात राहण्यास होत्या. आश्रमातून मुलींचे अपहरण झाल्याच्या घटनेने शहरात चिंतेचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :KidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारी