शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

रिक्षात प्रवासी कोंबून अवैध वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:02 AM

पोलिसांचे दुर्लक्ष : शहरातील मुख्य रस्त्यांवरील प्रकार; नियमांचे उल्लंघन करून रिक्षाचालकांकडून प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

- शीतल मुंडे 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात तीन आसनी रिक्षांमधून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. तीन आसनी रिक्षामध्ये तीनच प्रवासी बसवून वाहतूक करण्याचा नियम असताना रिक्षाचालक या नियमाला बगल देत रिक्षामध्ये पाठीमागे चार-पाच व रिक्षाचालकाच्या डाव्या व उजव्या बाजूंना एक-एक प्रवासी बसवितात. रिक्षाचालक धोकादायक पद्धतीने रिक्षा चालवितात. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

पिंपरी ते भोसरी, मोरवाडी ते चिंचवड स्टेशन, पिंपरी शगुन चौक ते काळेवाडी फाटा, पिंपरी ते रहाटणी, पिंपरी ते कासारवाडी, पिंपरी ते खडकी, नाशिक फाटा ते भोसरी, मोरवाडी ते चिखली, निगडी ते भोसरी, आकुर्डी ते चिखली, चिंचवड ते केएसबी चौक, चिंचवड स्टेशन ते चिंचवड, डांगे चौक ते चिंचवड, बिजलीनगर ते निगडी प्राधिकरण, आकुर्डी रेल्वे स्टेशन ते भक्ती-शक्ती, रावेत ते डांगे चौकासह शहरातील आदी प्रमुख मार्गांवर सर्रासपणे असे अवैध प्रवासी वाहतुकीचे चित्र पहावयास मिळते.

वाहतूक पोलिसाच्या समोरून अशा रिक्षा भरून जात असतानाही पोलीस त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने रिक्षाचालक अवैध वाहतूक करीत असल्याची चर्चा नागरिक करीत आहेत. शहरामध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत. सुमारे ४० हजार रिक्षा कोणताही परवाना नसताना वाहतूक करीत असल्याची तक्रार परवानाधारक रिक्षाचालक करीत आहेत. रिक्षाचालक नियम धाब्यावर बसवून बिनधास्तपणे अवैध वाहतूक करीत आहेत.परवान्याविनाच रिक्षा४शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विनापरवाना रिक्षा धावतात. मात्र या वाहतुकीकडे पोलीस डोळेझाक करतात. विनापरवाना रिक्षांमुळे परवानाधारक आरटीओ सर्व कर भरणाºया रिक्षाचालकांना नुकसान सहन करावे लागत असल्याची तक्रार आहे. अवैध वाहतूक करणाºया रिक्षाचालकांकडे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा परवाना नाही. गणवेश, रिक्षाचा विमा, बॅज आदी काहीही नसताना त्यांच्याकडून प्रवासी वाहतूक केली जाते.नियम बसवले धाब्यावर४आरटीओच्या नियमाप्रमाणे प्रत्येक रिक्षाचालकाने गणवेश घालणे आवश्यक आहे. मात्र हातावर मोजण्याइतकेच रिक्षाचालक गणवेश घालतात. नियमाप्रमाणे तीन प्रवाशांपेक्षा जास्त प्रवासी रिक्षात बसवले नाही पाहिजे, असा नियम असताना सर्रासपणे त्याचे उल्लंघन शहरामध्ये होत आहे. वाहतूक पोलिसांसमोर रिक्षाचालक मागे चार, पुढे दोन जण घेऊन वाहतूक करीत असतात.1शहरामध्ये रिक्षांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणात वाढ होत आहे. अनेक रिक्षाचालक पीयूसी घेत नाहीत. त्यामुळे प्रदूषणात वाढ होते. शहरातील अनेक रिक्षा भंगार झालेल्या असतानाही रस्त्यावर धावत आहेत. त्या रिक्षामधून मोठ्या प्रमाणात आवाज येतात. त्यामुळे ध्वनिप्रदूषणातदेखील वाढ होते.2रिक्षाचालक व प्रवाशांमधील वादविवाद आता रोजचेच झालेले आहेत. शहरातील कुठल्याही रस्त्यावर आपण पाहिले, तर रिक्षाचालक व प्रवाशांचे वादविवाद दिसतात. कधी कधी हे वादविवाद एवढे मोठे असतात की, त्यामध्ये पोलिसांना हस्तक्षेप करावा लागतो. अनेक रिक्षाचालक प्रवाशांबरोबर व्यवस्थित व्यवहार करत नाहीत. त्यामुळे वादाचे प्रसंग उद्भवतात.3शहरामध्ये प्रत्येक रस्त्यावर, चौकात रिक्षाचालक तीन प्रवाशांपेक्षा अधिक प्रवासी घेऊन वाहतूक करताना दिसतात. मात्र त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. पीएमपीचे बसथांबे रिक्षाचालकांनी आपले रिक्षा स्टॅण्ड बनविले आहे. त्यामुळे पीएमपी थांब्यावर थांबलेल्या प्रवाशांना याचा त्रास होतो. वाहतुकीसदेखील याचा अडथळा निर्माण होतो.4रिक्षाचालक नेहमीच वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असतात. मात्र त्यांच्यावर कारवाई करताना कोणीही दिसत नाही. सर्वसामान्य नागरिकाने जर एखाद्या वेळी चुकू न नियम तोडला, तर लगेच पोलीस कारवाई करतात. चौकामधील सिग्नलला वाहतूक पोलीस असतानाही रिक्षाचालक सिग्नल तोडून जातात. मात्र त्याच्यावर कारवाईही होत नाही. अनेक रिक्षाचालक मोठ्या आवाजात गाणे लावून रिक्षा चालवत असतात. त्याच्या त्रास दुसºया वाहनचालकांना होत असतो. 

रिक्षाचालक तीन व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्ती रिक्षामध्ये बसवतात. रिक्षाच्या मागील सीटवर चार ते पाच प्रवासी बसवल्यामुळे कोणालाही व्यवस्थित बसता येत नाही. यामुळे रिक्षातून पडण्याचीदेखील भीती वाटते. जर एखाद्या रिक्षाचालकाला म्हणाले, तीनच प्रवासी बसवा, तर तो रिक्षाचालक म्हणतो दुसºया रिक्षाने जा. आम्हाला परवडत नाही किंवा मीटरने जा, अशा प्रकारची उत्तरे रिक्षाचालक देत असतात.

- नेहा दळवी, प्रवासी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड