पिंपरी : आकुर्डी येथे पाठीमागून येऊन अचानक महिलेला मिठी मारणाऱ्या माथेफिरूस नागरिकांनी चोप दिला. ही घटना गुरुवारी (दि.२४ मे)सकाळी दहाच्या सुमारास घडली. चोप देऊन नागरिकांनी माथेफिरूस निगडी पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर भिमराव प्रमाणे (वय ४२,रा.वाल्हेकरवाडी ) असे या मनोविकृताचे नाव आहे. सकाळी दहाच्या सुमारास २९ वर्षीय महिला रस्त्यालगत थांबली असता अचानक मागून येऊन माथेफिरूने तिला मिठी मारली. अचानक घडलेल्या या प्रकराने महिला घाबरली. आरडाओरडा करताच त्याठिकाणी नागरिक जमा झाले. घडला प्रकार समजल्यावर नागरिकांनी माथेफिरूला चोप दिला. ही घटना निगडी पोलिसांना कळवुन त्यांनी आरोपीला त्यांच्या ताब्यात दिले. निगडी पोलीस आरोपीला घेऊन गेले. मनोविकृत असल्यामुळे त्याने हे कृत्य केले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
महिलेला मिठी मारणाऱ्या माथेफिरूस नागरिकांचा चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 15:06 IST