शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी पुरुषांनी मारले वडाला सात फेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 16:34 IST

जन्माेजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी पुरुषांनी वडाच्या वृषाला फेऱ्या मारल्या. पिंपरीतील सांगवी भागात हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.

सांगवी :  मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेच्या वतीने चक्क पुरुषांनी वटपौर्णिमा साजरी केली. जन्मो जन्मी हीच पत्नी मिळावी,यासाठी पुरुषांनी वडाच्या वृक्षाला सात फेरे मारले. चार वर्षांपासून हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे.

महिलांच्या पारंपरिक सणात पुरुषांनी सहभाग घेतल्याने सदर कार्यक्रमास एक विशेष महत्व आल्याचे नागरिकांनी यावेळी मत व्यक्त केले. सत्यवानाला साक्षात यमाच्या दारातून परत आणणाऱ्या सावित्रीच्या त्यागाची व पतिव्रतेचे महत्व असलेल्या वटसावित्री पौर्णिमेस विशेष महत्व असून महिला या दिवशी उपवास करतात.  पुरुषांनीही यासाठी वटवृक्षाचे पूजन केले तर ती खरी समानता होईल ही भावना मनात ठेऊन मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेच्या वतीने पुरुषांनी वटपौर्णिमा साजरी केली. स्त्री समानता प्रत्यक्ष कृतीतून दिसली पाहिजे व त्या भावनेने पुरुषही स्रियांसोबत आहेत हा आगळ्या वेगळ्या उपक्रमामागील मागील उद्देश असल्याचे संस्थेच्या वतीने अण्णा जोगदंडे यांनी यावेळी सांगितले. चाळीस पुरुषांनी वडाच्या झाडाला सूत बांधून प्रदक्षिणा मारल्या व पत्नीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वटसावित्रीचे खरे पूजन केल्याचे समाधान मिळाल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, पिंपरी चिंचवड अध्यक्ष अण्णा जोगदंड, शहर उपाध्यक्ष विकास शहाणे, मराठवाडा विकास मंचचे अरुण पवार, एस. डी. विभूते, संगीत जोगदंड,अँड.सचिन काळे, अरुण पाखरं अरविंद मांगले, वसंतराव चकटे,पी.पी.पिल्ले, शांताराम पाटील,मुरलीधर दळवी,हनुमन्त पंडित,दीपक शहाणे,गजानन धाराशिवकर,दत्तात्रय घोरपडे,प्रकाश बंडेवार, शिवानंद तालिकोटी सुरेश पेठकर ,अप्पाजी चव्हाण, जीवन धवण आदींनी सहभाग घेतला. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcultureसांस्कृतिकSangviसांगवी