शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

संत तुकाराम संतपीठासाठी ठेकेदारावर मेहेरबानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 01:14 IST

वाढीव दराच्या निविदांना मान्यता : ४० कोटींचा खर्च ४५ कोटींवर; चिखलीत होणार काम सुरू

पिंपरी : महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे जगद्गुरू संत तुकाराममहाराज संतपीठ उभारण्यात येत आहे. त्याच्यासाठी महापालिकेने ४० कोटी रुपयांचा खर्च गृहीत धरला असताना कंत्राटदारांनी जादा दराच्या निविदा भरल्या आहेत. त्यामुळे ४० कोटींच्या कामाला आता पंचेचाळीस कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे ठेकेदाराचे चांगभले होणार आहे.

वारकरी संप्रदायातील भागवत धर्माचा प्रसार व प्रचार व्हावा, वारकरी संप्रदायाचे पारंपरिक शिक्षण जनमाणसांना मिळावे, या उद्देशाने हे ‘संतपीठ’ उभारण्यात येत आहे. टाळगाव चिखलीला सांप्रदायिक वारसा असून, शेजारीच श्रीक्षेत्र आळंदी, देहू या तीर्थक्षेत्रांचे सान्निध्यही लाभले आहे. त्यामुळे टाळगाव चिखली येथे राज्यातील पहिले ‘जगद्गुरू संत तुकाराममहाराज संतपीठ’ उभारण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्टÑवादी काँग्रेसची सत्ता असताना घेण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये उभारण्यात येणाऱ्या या संतपीठ उभारणीला १३ मे २०१५ रोजी महापालिका सभेत मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर माध्यमिक शाळेसाठी आरक्षित चिखली येथील १ हेक्टर ८० गुंठे जागा महापालिकेला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. या संतपीठामध्ये निवासी स्वरुपाचे, प्राथमिक शाळेपासून ते उच्च पदवीपर्यंतचे केवळ संतसाहित्यावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. येथे वसतिगृह, सभागृह, अभ्यासवर्ग आदींचा समावेश असणार आहे. येथील शाळेमध्ये सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना प्रवेश असून, हे संतपीठ मराठी माध्यमातून शिक्षण देणारे असणार आहे. महापालिकेतर्फे उभारण्यात येणारे हे संतपीठ आणि त्या अनुषंगाने शाळा व्यवस्थापनासाठी कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. संतपीठाच्या इमारत बांधकामासाठी महापालिकेतर्फे ४० कोटी ६१ लाख रुपयांची निविदा मागविण्यात आली.रिंग झाल्याचा संशय४बी. के. खोसे यांनी ११.१६ टक्के जादा, व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांनी १४.७० टक्के जादा, तर एस. एस. साठे यांनी १६ टक्के जादा दराने निविदा सादर केल्या. बी. के. खोसे यांनी सादर केलेली वाढीव दराची निविदा स्वीकारण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे. त्यानुसार म्हणजेच ४४ कोटी ६१ लाख ७३ हजार ३२३ रुपये अधिक रॉयल्टी चार्जेस ३६ लाख ९२ हजार २६४ आणि मटेरिअल चार्जेस १० लाख ३१ हजार ४७७ रुपये असे एकूण ४५ कोटी ८ लाख ९७ हजार ६४ रुपये इतका खर्च संतपीठ उभारणीसाठी येणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे