शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

महापौर आणि आमदारांची सायकलवर रपेट ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 16:19 IST

शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांना आरोग्यदायी असावे त्याकरिता नागरिकांनी सायकल शेअरींगचा उपक्रम सुरू केला आहे..

ठळक मुद्देप्रायोगिक तत्वावर ३४ ठिकाणी सायकल शेअरींगएका महिन्यामध्ये इलू ३० अंतर्गत १०० रुपयांमध्ये ३० फे-या घेता येणार

पिंपरी : दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहनांची संख्या, त्यातून उद्भवणारी वाहतुक कोंडी, प्रदुषण आणि धोक्यात आलेले सर्वसामान्यांचे आरोग्य यामुळे शहरातील प्रत्येक नागरिक हतबल आहे. आहे. परंतु, कितीही समस्या वाढल्या तरी प्रत्येकाला कर्मभूमी सोडता येत नाही. त्यामुळे या समस्यांवर मात करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यातलाच एक पर्याय म्हणून चिंचवड शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने सायकल शेअरींग उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठीच चक्कं पिंपरींचे महापौर, आमदारांनी रस्त्यावरुन रपेट मारली. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडमार्फत एरिया बेस डेव्हलपमेंट अंतंर्गत सार्वजनिक सायकल सुविधा प्रकल्पाचा प्रारंभ पिंपळे सौदागर ते पिंपळे गुरव सायकल चालवून आमदार लक्ष्मण जगताप, यांचे हस्ते संपन्न झाला. पिंपळे सौदागर येथील कार्यक्रमास आयुक्त श्रावण हर्डीकर,स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, शहर सुधारणा समिती सभापती सीमा चौगुले,  नगरसदस्य विठ्ठल काटे, निर्मला कुटे, शत्रुघ्न काटे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहमुख्य कार्यकारी अधिकारी निलकंठ पोमण, सह शहर अभियंता राजन पाटील सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.  महापौर राहुल जाधव म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकमध्ये या प्रकल्पामुळे भर पडणार असून दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूकीच्या समस्येला आळा बसेल व नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे. तसेच शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांना आरोग्यदायी असावे त्याकरिता नागरिकांनी सायकल शेअरींगचा वापर करावा, असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले. श्रावण हर्डीकर म्हणाले, राज्य व केंद्र शासनाच्या मान्यतेने पिंपरी चिंचवड शहराचा समावेश स्मार्ट सिटी शहरामध्ये झालेला असून अल्प कालावधीत शहराचा स्मार्ट सिटी आराखडा शासनाकडे पाठविण्यात आला याकामी लोकप्रतिनिधी, प्रशासन व शहरातील नागरिक यांची फार मोठया प्रमाणात मदत झालेली आहे.नागरिकांना दैनंंदिन जीवनातील त्रास कमी व्हावा त्यांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी चांगल्या योजना निर्माण करण्याचा उद्देश या स्मार्ट सिटीमध्ये आहे. भविष्यातील नियोजन लक्षात घेता टप्या-टप्याने हे शहर स्मार्ट व सुंदर करण्याकरिता सर्वांनी सहकार्य करावे भविष्यात सार्वजनिक वाहतूक सुविधेला सक्षम करावे लागेल पादचा-यासाठी फुटपाथ सुविधे बाबत व सायकल स्वरांसाठी सुविधा देणे गरजेचे आहे. त्यांचे नियोजन या प्रकल्पात करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले प्रायोगिक तत्वावर ३४ ठिकाणी सायकल शेअरींगपिंपळे सौदागर व्दारकाधीश सोसायटी, कुंजीर गार्डन, कुणाल आयकॉन रोड, साई गार्डन, गोविंद यशदा चौक बीआरटीएस, पी.के. चौक बीआरटीएस, निसर्ग निर्मिती सोसायटी बीआरटीएस,रहाटणी रोड राधिका शॉप, शिवाजी पुतळा चौक, महादेव मंदिर आरक्षित नं ३६१ गार्डन, काटे पुरम चौक बीआरटीएस,  पिंपळे गुरव जवळकर चौक बीआरटीएस, सेव्ह ट्री चौक, शिव गणेश चौक, शिरोडे रोड ब्लयू डार्ट आॅफिस, काटेपूरम चौक कुंदन सुपर मार्केट, रामकृष्ण चौक, दापोडी रोड आरक्षण क्र ३४७, गायत्री मेडीकल स्टोअर दापोडी रोड, आदी सायकल शेअरींगचे ठिकाणे असणार आहे. या योजनेचा लाभ ३१ आॅगस्ट २०१८ अखेर सवलतीच्या दरामध्ये नागरिकांना घेता येईल एका महिन्यामध्ये इलू ३० अंतर्गत १०० रुपयांमध्ये ३० फे-या घेता येतील व यापुढे दर अर्ध्या तासाला रक्कम रुपये ५ असतील. 

टॅग्स :PuneपुणेMLAआमदारLakshman Jagtapलक्ष्मण जगतापMayorमहापौर