शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अंदर मावळ चार दिवस अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 06:19 IST

मावळात गेल्या काही महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याने याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. भरमसाठ वीजबिल वेळेवर भरूनही ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.

कामशेत - मावळात गेल्या काही महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याने याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. भरमसाठ वीजबिल वेळेवर भरूनही ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. वीजवितरण महामंडळाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून, या भागालाच दुजाभावाची वागणूक का दिली जाते, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. सध्या दहावीची परीक्षा सुरू असून अंदर मावळात मागील चार दिवसांपासून वीज नसल्याने विद्यार्थ्यांवर मेणबत्तीच्या उजेडात अभ्यास करण्याची वेळ आली आहे.मागील काही महिन्यांपासून नाणे, पवन, अंदर मावळासह कामशेत शहरात वारंवार वीज गायब होण्याचे प्रकार वाढले असून, काही दुर्गम गावांमध्ये वीज गेल्यानंतर ती दोन दोन दिवस येत नाही. वीज महामंडळाने भारनियमन नसताना अघोषित भारनियमन सुरू केले आहे. यामुळे नागरिकांसह अनेक दुकानदार त्रस्त झाले आहेत. गुरुवारी दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा बंद केला जातो. त्या शिवाय आठवड्यातून अनेकदा वीज गायब होते. तेव्हा कोणते दुरुस्तीचे काम करीत असतात. असा प्रश्न नागरिक विचारात आहेत.अंदर मावळात मागील चार दिवसांपासून वीज गेली असूनअद्याप पूर्ववत झाली नसल्याची तक्रार राजू खांडभोर, नारायण ठाकर, निवृत्ती वाडेकर, गुलाब गबाले, कुंडलिक लष्करे, कैलास खांडभोर, भरत लष्करे, दशरथ वाडेकर, छगन लष्करे, बळीराम वाडेकर आदींनी केली आहे. दहावीच्या परीक्षा सुरु असताना वीज गायब झाल्याने मोठा त्रास होत असून याविषयी महावितरण कार्यालयात तक्रार देऊन ही उपाययोजना होत नाहीत.परिस्थिती जैसे थे : आश्वासनांचा विसर१मावळातील वारंवार खंडित होणाºया वीजेचा प्रश्न ताबोडतोब मार्गी लावावा यासाठी काही महिन्यांपूर्वी नागरिकांनी महावितरण कार्यालयावर टाळे ठोको आंदोलन ही केले होते. त्या वेळी वीज महावितरणच्या अधिकाºयांनी पंधरा दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनांचा म्हणावा तसा फायदा झाला नाही.२वीज वितरण मंडळाची ‘जैसे थे’ अशीच स्थिती आहे. वेळेनंतर येणारी मोठ मोठी रकमेची विजेची बिले भरूनसुद्धा वीज ग्राहकाला वीजेविनाच राहावे लागत असल्याने मावळातील वीजग्राहक राजा संतापला आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी महावितरणकडे वारंवार पाठपुरावा करूनही योग्य दखल घेतली जात नसल्याने रोष व्यक्त केला जात आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र