शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

मावळ तालुक्यात चोरांचा सुळसुळाट, चोरीच्या घटनांत वाढ, टोळी आल्याच्या चर्चेला पुन्हा ऊत; तत्काळ संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 03:32 IST

कामशेत : मागील तीन ते चार दिवसांपासून मावळ तालुक्यातील महत्त्वाच्या शहरांसह परिसरात चोरांचा सुळसुळाट झाला असून, वाहनचोरी व भुरट्या चोºया वाढल्या आहेत. परिसरात चोर आल्याच्या चर्चांना पुन्हा ऊत आला आहे.सहा महिन्यांपूर्वी चोरांच्या मोठ्या टोळीमुळे मावळ परिसर हादरून टाकला होता. ती अफवा असल्याचेही बोलले जात होते. मात्र, चोरांची मोठी दहशत निर्माण ...

कामशेत : मागील तीन ते चार दिवसांपासून मावळ तालुक्यातील महत्त्वाच्या शहरांसह परिसरात चोरांचा सुळसुळाट झाला असून, वाहनचोरी व भुरट्या चोºया वाढल्या आहेत. परिसरात चोर आल्याच्या चर्चांना पुन्हा ऊत आला आहे.सहा महिन्यांपूर्वी चोरांच्या मोठ्या टोळीमुळे मावळ परिसर हादरून टाकला होता. ती अफवा असल्याचेही बोलले जात होते. मात्र, चोरांची मोठी दहशत निर्माण झाली होती. त्यातून मावळवासीय नुकतेच सावरले असताना पुन्हा चोर आल्याच्या व चोºयांच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याने चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.दोन हजारांच्या संख्येने मावळात चोर दाखल झाले आहेत. ते रानामाळाने पळतात. त्यांच्या अंगात शर्ट नाही. पाठीवर बॅग आहे. ते वानरांसारखे घराच्या छतावरून उड्या मारतात. अशा व या प्रकारच्या विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते. सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मावळातील पोलीस प्रशासनाकडे नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी पोलीस यंत्रणा कमी पडत होती.या काळात गावेच्या गावे रात्र जागवत होती. गावांमधील वृद्धांसह तरुण युवक गस्ती घालत होते. लोकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली होती. रात्री सात वाजल्यानंतर घराबाहेर पडणे लोक टाळत होते. पोलीस यंत्रणाही कसून तपास करीत होती. डोंगरच्या डोंगर पालथे घालूनही चोर काही सापडत नव्हते. त्यामुळे या सर्व अफवा आहेत, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे वारंवार पोलीस अधिकाºयांकडून आवाहन केले जात होते. काही दिवसांतच या सर्वांवर पडदा पडला व नागरिकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. जनजीवन भयमुक्त झाले. पण एक आठवड्यापासून पुन्हा चोर आल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे. महत्त्वाच्या शहरांमध्ये चोºयांच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी रात्री चोर आल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. चोर आल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व तरुणांसह पोलीस यंत्रणा कामाला लागली असून, त्यांच्या हाती मात्र अजूनही काही गवसले नाही, अशी माहिती मिळते.तीन ते चार दिवसांत लोणावळा शहरासह परिसरातील ग्रामीण भागात चोरीच्या घटना घडल्या आहेत. कामशेत येथे पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर जुना मुंबई-पुणे महामार्गाच्या सेवा रस्त्याच्या शेजारी शुक्रवारी (दि. १८) रात्रीच्या सुमारास मोटार (एमएच १४ सीके ३६०९) चोरीला गेल्याची तक्रार रामदास राणे यांनी कामशेत पोलीस ठाण्यात दिली आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरातून बाळकृष्ण शंकर गरुड यांची दुचाकी ( एम एच १४ ए के २१५१ ) झाली असून याची तक्रार कामशेत पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. कामशेत परिसरात वाहन चोरीच्या घटना वाढल्या असून शहराच्या महत्वाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची मागणी होत आहे. मागील तीन दिवसांत सहारा कॉलनी, देवराम कॉलनी, इंद्रायणी कॉलनी व इतर परिसरात रात्रीच्या वेळी चोर दिसले असल्याची चर्चा सुरू असून, परिसरातील नागरिक रात्रीचा पहारा देऊ लागले आहेत. काही ठिकाणी चोºया होत असून, स्थानिक नागरिक तक्रार करण्यास पुढे येताना दिसत नाहीत. त्यामुळे नक्की किती चोºया झाल्या, याचा निश्चित आकडा सांगणे कठीण आहे.पोलीस चौकी सज्ज : पेट्रोलिंग सुरुजुन्या महामार्गावरील इंद्रायणी पुलाजवळ व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ताजे गावच्या हद्दीत पोलीस चौकी तयार केली असून, रात्री पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता चोर अथवा अज्ञात इसम आढळल्यास, तसेच चोरीची घटना घडल्यास तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांनी केले आहे.वाढत्या चोºयांच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व कारवाईच्या सूचना प्रत्येक पोलीस स्टेशन अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव व इतर सणाच्या पार्श्वभूमीवर रात्रीची स्पेशल गस्त घालण्यात येत आहे. कोठेही अनुचित प्रकार अथवा संशयित आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डी. डी. शिवथरे यांनी केले आहे.