शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मावळ लोकसभा निवडणूक : उमेदवारांच्या मताधिक्यावरून मावळात पैजा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 13:17 IST

सलग दहा वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेला मावळचा गड शिवसेना राखणार, की सेनेच्या बालेकिल्ल्यात घड्याळाचा गजर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देनिकालावर ठरणार आगामी विधानसभेची समीकरणेविधानसभा इच्छुकांची लोकसभेतच मोर्चेबांधणी 

-विजय सुराणा - वडगाव मावळ : मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत ५९ टक्के मतदान झाले. झालेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार अन् कोण, कोणत्या विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य घेणार याच्या चर्चेचे गु-हाळ सुरू आहे. केवळ चर्चाच नाही, तर मावळ तालुक्यात युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे की आघाडीचे पार्थ पवार यांच्यापैकी कोणाला मताधिक्य मिळणार यावरून गावोगावी लाखो रुपयांच्या पैजा लागल्या आहेत.  मावळ लोकसभा मतदारसंघात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे नातू व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे रिंगणात उतरल्याने ही लढत चुरशीची झाली आहे. सलग दहा वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेला मावळचा गड शिवसेना राखणार, की सेनेच्या बालेकिल्ल्यात घड्याळाचा गजर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणूक ही आगामी विधानसभेची रंगीत तालीम आहे. त्यामुळे लोकसभेतील विधानसभानिहाय मताधिक्यावरून भाजपा आणि राष्ट्रवादीतील आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्यांचे भवितव्य ठरणार आहे.  मावळात कौल युती की आघाडीच्या बाजूने लागणार याकडे लक्ष आहे. ..........विधानसभा इच्छुकांची लोकसभेतच मोर्चेबांधणी मावळ विधानसभेत दोन्हीपैकी एका उमेदवारास केवळ पाच ते दहा हजारांच्या घरात आघाडी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या वतीने विद्यमान आमदार बाळा भेगडे, सुनील शेळके, रवींद्र भेगडे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बापूसाहेब भेगडे, बाळासाहेब नेवाळे, बबन भेगडे, अर्चना घारे, गणेश खांडगे, गणेश ढोरे, बाबूराव वायकर ही नावेही इच्छुकांमध्ये चर्चेत आहेत. लोकसभा निवडणुकीत मताधिक्य दिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून संधी मिळण्यासाठी सर्वच इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ........राष्ट्रवादीचे सर्व गट आले एकत्र मावळ तालुक्यात भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रबळ पक्ष आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपाचे तर सहकार क्षेत्रात राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. गेल्या २५ वर्षांत राष्ट्रवादीमधील गटबाजीचा भाजपाला अनेकदा फायदा झाला. परंतु या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील सर्व गट एकत्र आले होते. त्यात कॉँग्रेसची साथ व मनसेचा पाठिंबा मिळाल्याने राष्ट्रवादीला आशा आहे. युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची भिस्त भाजपाच्या पक्ष संघटनेवर अवलंबून होती. त्यात शिवसेनेचा एक गट अलिप्त होता. तरीही सुप्त मोदी लाटेचा फायदा होईल अशी शक्यता महायुतीकडून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmaval-pcमावळLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९