शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मावळमध्ये सव्वा बाविस लाख मतदार ; अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 22:22 IST

मावळ लोकसभा मतदार संघात २२ लाख २७ हजार ७३३ मतदार नोंदणी झाली आहे.

पिंपरी : केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतीम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. मावळ लोकसभा मतदार संघात २२ लाख २७ हजार ७३३ मतदार नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरूषांची संख्या अधिक आहे. महिलांची टक्केवारी कमी आहे. 

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार नोंदणी, पुरवणी यादी अंतिम झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सर्व विधानसभा मतदार संघात मतदार जागृती आणि मतदार प्रबोधनही केले होते. महाविद्यालयांमध्ये जागृती करण्यात आली. त्यामुळे नोंदणी मोठ्याप्रमाणावर झाली होती. तसेच शहरीभागात ऑनलाईन नोंदणीलाही प्राधान्य दिले होते. ग्रामीण भागात आॅनलाईन मतदार  नोंदणीला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे.  

मावळ लोकसभा मतदार संघात पिंपरी, चिंचवड, कर्जत, मावळ, उरण, पनवेल अशा सहा विधानसभा असून मतदारांमध्ये ५ लाख १४ हजार ९०२ सर्वाधिक मतदार हे पवनेल मतदार संघात असून त्यापाठोपाठ चिंचवडमध्ये ४ लाख ७६ हजार,७८०,  पिंपरीत ३ लाख ४१ हजार ७०१, मावळमध्ये ३ लाख ३२ हजार २१५, उरणमध्ये २ लाख ८६ हजार ६५८ तर  कर्जतमध्ये  २ लाख ७५ हजार ४७७ मतदार आहेत. एकुण मतदारांमध्ये पुरष मतदार ११ लाख ६५ हजार ७८८ असून महिला मतदार १० लाख ६१  हजार ३१३ मतदार आहेत. तसेच तृतीयपंथी मतदार ३२ आहेत. तसेच सर्व्हिस वोटर सहाशे आहेत.   

महिला मतदारांची संख्या कमी मावळ लोकसभा मतदार संघात पुरूष मतदारांच्या संख्येत महिला मतदारांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे. पुरूष मतदार ११,६५,७८८ असून महिला मतदार १०,६१,३१३ आहेत. तृतीय पंथीयांची संख्या चिंचवड विधानसभेत अधिक आहेत. तर सर्हिस वोटरची संख्या चिंचवड, पिंपरी, पनवेल आणि मावळमध्ये अधिक आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmaval-pcमावळpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड