शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

मटक्याचे आकडे मोबाइलवर, तरुणांना आकर्षित करण्यासाठी फंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 03:35 IST

उद्योगनगरीतील अडचणीच्या एखाद्या बोळकंडीत, गल्लीत व टपरीवजा जागेत मटक्याचे अड्डे दिसून येत आहेत. त्याचा प्रचारासाठी स्मार्ट फोनच्या माध्यमातून जुगार खेळण्यासाठीही हायटेक यंत्रणा वापरात आणली जात आहे. त्यामुळे मटका पेपरलेस होऊ लागला असून, मटक्याचे आकडे आता मोबाइलवर मिळू लागले आहेत.

रहाटणी - उद्योगनगरीतील अडचणीच्या एखाद्या बोळकंडीत, गल्लीत व टपरीवजा जागेत मटक्याचे अड्डे दिसून येत आहेत. त्याचा प्रचारासाठी स्मार्ट फोनच्या माध्यमातून जुगार खेळण्यासाठीही हायटेक यंत्रणा वापरात आणली जात आहे. त्यामुळे मटका पेपरलेस होऊ लागला असून, मटक्याचे आकडे आता मोबाइलवर मिळू लागले आहेत. पिंपळे सौदागर परिसरात आॅनलाइन मटक्याकडे तरुणवर्ग आकर्षित होऊ लागला आहे. बेईमानीचा धंदा हा विश्वासावरच चालत असल्याने मोबाइलवरील मटक्याचे आकडे व आॅनलाइन बेटिंग वाढू लागले आहे.जुगार खेळण्यासाठी क्षणार्धात माहितीचे आदान-प्रदान करणाऱ्या स्मार्ट फोनचा वापर मटक्यासाठी केला जातो. शहरातील मटका अड्ड्यांविषयी चर्चा आहे. एखाद्या टपरीवजा खोलीला मळकट पडदा लावलेले मटक्याचे पारंपरिक पद्धतीचे अड्डे झोपडपट्टीमध्ये, रेल्वे पुलाखाली, नाल्याच्या बाजूला अडगळीच्या ठिकाणी दिसून येतात. मटका आणि बेटिंग मोठ्या प्रमाणावर आॅनलाइन झाल्याने आपल्या हद्दीत एकही मटका वा जुगार अड्डा नाही, असे पोलीस छातीठोकपणे सांगू लागले आहेत. एवढेच नव्हे, तर मटक्याचा अड्डा कोठे सुरू असेल तर कळवा, तातडीने कारवाई करू, अशी ग्वाहीसुद्धा त्यांच्याकडून दिली जात आहे.शहरात मटक्याचे अड्डे आहेत; परंतु ते पेपरलेस बनले आहेत. मटका आणि जुगारअड्डा चालविणाºयांनी त्यांच्या नेहमीच्या ग्राहकांचे व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार केले आहेत. एवढेच नव्हे, तर व्हॉट्स अ‍ॅपवरून मटक्याचे आकडेही पाठविले जात आहेत. शहरासह ग्रामीण भागात तत्काळ ‘आकडा’ कळविण्यास एसएमएसचा आधार घेतला जात आहे. व्हॉईस मेसेजही मटक्यासाठी फायद्याचा ठरत आहे. व्हॉट्स अ‍ॅपचा उपयोग आता मटका व्यवसायातही होत आहे.व्हॉट्स अ‍ॅपचा खुबीने वापरव्हॉट्स अ‍ॅप मटका व्यवसाय फायदेशीर ठरत असल्याने अनेकांनी एजंटना स्मार्ट फोन दिला आहे. काही तासांचे प्रशिक्षणही दिले आहे. हा प्रकार मटका व्यावसायिकांस सुरक्षित आणि विश्वसनीय वाटू लागला आहे. व्हॉट्स अ‍ॅपचा उपयोग करून स्थानिक पातळीवरच नव्हे, तर राज्यात आणि राज्याबाहेरही आकडा लावता येतो. वरकरणी परिसरात मटका बंद असल्याचे सांगितले जात असले, तरी मोबाइलच्या माध्यमातून मटका सुरू असून, घरबसल्या आकडा लावणाºयांचे प्रमाण वाढले आहे.मटक्याकडे तरुण आकर्षितव्यसनी, बेरोजगार अथवा रोजंदारीवर काम करणारे, अल्पशिक्षित असे मटका, जुगार अड्ड्यावरील ग्राहक आहेत. सुशिक्षित आणि जागरूक नागरिक यापासून चार हात दूर राहणेच पसंत करतात. शिक्षित असूनही मटका कसा खेळायचा, आकडा कसा लावायचा हे अनेकांना जमत नाही. हे जाणून घेण्याचाही कोणी प्रयत्न करीत नाही. आता मात्र परिस्थिती बदलू लागली आहे. गल्ली-बोळातील मटका अड्ड्यावर जाण्याची कधी गरज पडली नाही, अशांना आता मोबाइल स्क्रीनवर मटक्याची ओळख होऊ लागल्याने तरुणांनाही मटक्याचे स्मार्टमुळे आकर्षण वाटू लागले आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपPuneपुणे