शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा विभागाचा अजब कारभार ; नव्याने टाकलेली मुख्य पाईपलाईनच फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 14:00 IST

नागरिकांचे हाल; निकृष्ट कामामुळे पाईपलाईन फुटल्याची टीका

ठळक मुद्देदोषी असणाऱ्या ठेकेदारावर व अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी या भागात नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी वारंवार रस्त्यांचे खोदकाम

पिंपरी चिंचवड: मनमानी करणारे ठेकेदार,अकुशल कामगार व महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या मेहेरबान अधिकाऱ्यांमुळे शनिवारी (दि . ७)  चिंचवडमधील दळवीनगरात पहाटे नव्याने टाकलेली पाण्याची पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला.या गंभीर प्रकारामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले.        पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन टाकण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.यासाठी खोदकाम करण्यात आले. मुख्य जलवाहिनीतुन पहाटे पाणी सोडण्यात आले.मात्र निकृष्ट केलेल्या कामामुळे नव्याने टाकलेली पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली.या प्रकारामुळे दळवीनगर भागात पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली.तब्बल दोन तास या जलवाहिणीतून पाण्याची नासाडी सुरू होती.येथील खड्यात साठलेल्या पाण्यामुळे खोदकामाचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांचे व पादचाऱ्यांचे हाल झाले.दळवीनगरपासून ते प्रेमलोक पार्क पर्यंतच्या रस्त्यावर पाणी वाहत होते.या भागात नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी वारंवार रस्ते खोदले जात आहेत.मात्र कामाची अर्धवट माहिती असणारे अकुशल कामगार हे काम करत असल्याने पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू असून या कडे पालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.आज रात्री उशिरापर्यंत मुख्य पाईपलाईन जोडण्याचे काम सुरू होते.पहाटे या पाईपलाईनची जोडणी तुटल्याने पाण्याची नासाडी झाली.संपुर्ण परिसर जलमय झाला होता.या मुळे नागरिकांचे व वाहन चालकांचे हाल झाले.या प्रकारात दोषी असणाऱ्या ठेकेदारावर व अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.पाण्याच्या प्रेशरमुळे या भागात मोठे खड्डे झाले आहेत.याचा अंदाज न आल्याने अनेक वाहने येथे अडकून पडली होती.स्थानिक कार्यकर्ते मदतीला धावल्याने अनेकांची सुटका झाली.या भागातील पाणी पुरवठा बंद झाल्याने नागरिकांचे हाल झाले.या घटनेची आयुक्तांनी दखल घ्यावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणी