शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पिंपरीत मतदानाचा टक्का घसरला ; मावळमध्ये वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 13:47 IST

Pimpri Election 2019 : चिंचवडमध्ये ४३९, भोसरीत ४११, पिंपरीत ३९९ आणि मावळमधील ३७० मतदान केंद्रांवर झाले मतदान..

ठळक मुद्दे मतदान यंत्र बंद पडणे, चुकीची नावे असणे अशा तक्रारी वगळता शांततेत मतदान

पिंपरी : विधानसभा निवडणुकीतील पिंपरी, चिंचवड, भोसरी व मावळ या मतदारसंघांमध्ये मतदान झाले. चिंचवड आणि भोसरीतमतदानाचा टक्का घसरला असून, मावळमध्ये तो वाढला आहे. या चार मतदारसंघांतील ४८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. मतदान यंत्र बंद पडणे, चुकीची नावे असणे अशा तक्रारी वगळता चिंचवड, भोसरी आणि मावळमध्ये शांततेत मतदान झाले. तर, पिंपरीत बोगस मतदान केल्याचा आरोप करण्यात आला. तर माजी महापौर डब्बू आसवानी यांना मारहाणीचा प्रकार घडला. विधानसभा निवडणुकीचे मतदान सोमवारी झाले. मतदानाची प्रक्रिया सकाळी सातपासून सुरू झाली होती. पिंपरी, चिंचवड,  मावळ आणि भोसरी या मतदारसंघांतील १,६१९ मतदान केंद्रांवर सकाळपासूनच गर्दी दिसत होती. चिंचवडमध्ये ४३९, भोसरीत ४११, पिंपरीत ३९९ आणि मावळमधील ३७० मतदान केंद्रांवर सकाळी सातपासूनच मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी, यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज होती. विधानसभा निवडणूक ही शेवटच्या टप्प्यात आली आहे. आज सकाळपासूनच पावसाचे वातावरण असल्याने मतदानाची टक्केवारी कमी होती की काय असे चिन्ह होते़ मात्र पहिल्या टप्प्यामध्ये चांगले मतदान झाले आहे. दुपारनंतर पावसाने पूर्णपणेउघडीप दिली. त्यामुळे दुपारी तीनवाजेपर्यंत मावळमध्ये ५३.०६, चिंचवडमध्ये ३५.६९, पिंपरीत ३१.२८, भोसरीत ४०.४५ टक्के मतदान झाले.  भोसरी मतदारसंघामध्ये नवमतदारांचा उत्साह वाखण्याजोगा होता. दुपारनंतर अनेक तरुणी व महिला यांनी घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला. अनेक केंद्रांवर सेल्फी पॉइंट उभारण्यात आले होते. त्याठिकाणी उत्सफूर्तपणे तरुणांनी फोटो काढले. तरुण मतदार ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन येत होते. त्यांना नावे शोधून देण्यास मदत करत होते. ...........रांगेत ज्येष्ठाचा मृत्यूपिंपरी : मतदान करण्यासाठी रांगेत उभे असताना एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी भोसरी येथे घडली. अब्दुल रहीम नूरमहंमद शेख (वय ६०, रा. शांतीनगर वसाहत, भोसरी) असे या मृत ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडVotingमतदानbhosari-acभोसरीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019