शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पिंपरीगावात बोगस मतदानाचा प्रयत्न फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 13:17 IST

Pune election 2019 : सतर्कतेमुळेच पिंपरीगावातील विद्यानिकेतन शाळेत बोगस मतदान करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.

ठळक मुद्देपोलिसांचा बंदोबस्त वाढविला मतदान अधिकारी व कर्मचारी मतदाराचे नाव, ओळखपत्र पडताळणी

पिंपरी : पिंपरी राखीव मतदारसंघातील पिंपरीगाव येथील विद्यानिकेतन शाळेतील मतदान केंद्रावर बोगस मतदान करण्याचा प्रयत्न झाला. मात्र मतदान कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत बोगस मतदानाचा प्रयत्न रोखला आहे. पिंपरीगावातील विद्यानिकेतन शाळेतील मतदान केंद्रात सकाळी शांततेत मतदानाला सुरूवात झाली. याच केंद्रात बुथ क्रमांक ३०४ सखी मतदान केंद्र आहे. महिला अधिकारी व महिला कर्मचाऱ्यांची या बुथवर नियुक्ती करण्यात आली आहे.  पावसाच्या सावटाखाली मतदानाला सुरूवात झाली.काही मतदारांचे ओळखपत्र तसेच नाव यात तफावत असल्याचे विद्यानिकेतन शाळेतील मतदान केंद्रावर मतदान अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अशा मतदारांना मतदान करता आले नाही. मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत अशा मतदारांना मतदान केंद्राबाहेर काढले. तसेच याबाबत पोलिसांना माहिती दिली.त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील, पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांनी या केंद्राला भेट दिली. तसेच पोलिसांचा बंदोबस्त वाढविला. 

प्रत्येक उमेदवाराचे मतदान प्रतिनिधी प्रत्येक बुथवर आहेत. मतदान करण्यासाठी आलेल्या मतदाराची ओळख त्यांच्याकडून पटविण्यात येत आहे. मतदान अधिकारी व कर्मचारी मतदाराचे नाव, ओळखपत्र पडताळून पाहत आहेत. त्यांच्या सतर्कतेमुळेच पिंपरीगावातील विद्यानिकेतन शाळेत बोगस मतदान करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. त्यामुळे बोगस मतदान झालेले नसून, मतदान प्रकिया सुरळीत असून, शांततेत मतदान होत आहे.- वैशाली इंदाणी-उंटवाल, निवडणूक निर्णय अधिकारी, पिंपरी मतदारसंघ

पिंपरी गावातील विद्यानिकेतन शाळेतील मतदान केंद्रावर  पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. या केंद्राला भेट देऊन पाहणी केली आहे. मतदार शांततेत मतदान करीत आहेत.- आर. आर. पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे)

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpimpri-acपिंपरीVotingमतदानMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019