शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कार्ल्यातील एकवीरा कळस चोरीच्या निषेधार्थ महाआरती; महिना उलटूनही लागेना तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 13:09 IST

एकवीरा देवीच्या मंदिराचा कळस चोरी होऊन महिना उलटला तरी चोरांचा शोध लागत नसल्याच्या निषेधार्थ कोळी, आगरी समाजाच्या वतीने एकवीरा देवीच्या मंदिरात महा आरती करण्यात आली. 

ठळक मुद्देपुढील महिनाभरात या चोरीचा छडा न लागल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन : अनंत तरे महाआरतीनंतर जमलेल्या नागरिकांनी गडावर नवीन विश्वस्तांनी लावलेले बोर्ड टाकले काढून

लोणावळा : वेहेरगाव गडावरील कुलस्वामीनी एकवीरा देवीच्या मंदिराचा कळस चोरी होऊन महिना उलटला तरी चोरांचा शोध लागत नसल्याच्या निषेधार्थ कोळी, आगरी समाजाच्या वतीने एकवीरा देवीच्या मंदिरात महा आरती करण्यात आली. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत कोळी, आगरी समाजाचे नेते राजाराम पाटील व श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार अनंत तरे म्हणाले, पुढील महिनाभरात या चोरीचा छडा न लागल्यास महाराष्ट्रातील तमाम कोळी, आगरी व तत्सम समाज या घटनेच्या निषेधार्थ तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, या आंदोलनादरम्यान घडणार्‍या घटनांना मात्र त्या वेळी शासन व पोलीस प्रशासन जबाबदार असेल. आजची महाआरती हा समाजाचा आक्रोश असल्याचे जयेंद्र कुणे यांनी सांगितले.श्री एकवीरा देवीच्या मंदिराच्या कळस चोरी प्रकरणाला आज एक महिना उलटला आहे. या प्रकरणाचा अद्याप कोणताही तपास लागलेला नाही. या चोरीच्या तपासाबाबत पाठपुरावा करण्याऐवजी वेहेरगावातील काही तथाकथित पुढारी व काही गावगुंडानी या कळस चोरीला राजकीय स्वरूप देऊन देवस्थानचे अध्यक्ष अनंत तरे व इतर काही विश्वस्तांना बेकायदेशीरपणे हटविण्याचा खोडसाळपणा केला आहे. महाआरतीनंतर गडावर या खोडसाळ कृत्याचा निषेध व्यक्त करत जमलेल्या नागरिकांनी गडावर नवीन विश्वस्तांनी लावलेले बोर्ड काढून टाकले. महाआरतीला आगरी, कोळी समाजाचे अध्यक्ष राजाराम पाटील, योगेश कोळी, डी.एम. कोळी, जयेंद्र खुणे, जयवंती कोळी, किशोर भोईर, जयवंत पोकळे, संतोष चौधरी, छाया जाधव, अरविंद भोईर, मयूरेश कोटकर, शिरीष राजके, दत्ता भोईर, किसन फुलोरे आदींसह शेकडो कोळी, आगरी भाविक उपस्थित होते. सदर बेकायदेशीर ट्रस्ट स्थापन करणार्‍यांवर पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी. तसेच एका महिन्याच्या आत कळस व कळस चोराचा तपास लावावा. अन्यथा पुढच्या महिन्यात लाखो भाविक, कोळी, आगरी, कोळी एकवीरा गडावर व परिसरात तीव्र आंदोलन करतील़ त्यास पोलीस व प्रशासन जबाबदार राहील, असे तरे यांनी नमूद केले.

टॅग्स :theftचोरीagitationआंदोलनpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड