शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महामेट्रोचा राडारोडा पवना नदीपात्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 02:30 IST

कारवाईबाबत महापालिका प्रशासनाची चालढकल

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी एकीकडे विविध स्तरावर प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र महामेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने पुणे मेट्रो मार्गिकेच्या सेगमेंटची निर्मिती सुरू असलेल्या नाशिक फाट्याजवळील कास्टिंग यार्डात तयार होणारा राडारोडा थेट पवना नदीपात्रात टाकला जात आहे. त्यामुळे नदीप्रदूषणात भर पडल्याचे दिसून येत आहे.सांडपाणी, तसेच कंपन्यांचे केमिकलयुक्त पाणी थेट नदीत सोडणे, राडारोडा टाकणे यामुळे शहरातून वाहणाºया पवना, इंद्रायणी व मुळा या नद्या दूषित झाल्या आहेत. या नद्यांच्या स्वच्छतेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. शहरातील सर्व भागात मैला-सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारले जात असून, नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठीही नियोजन केले जात आहे.दुसरीकडे महामेट्रोकडून नदीपात्रातच राडारोडा टाकला जात असल्याचे दिसून येते. पुणे मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी आवश्यक असणाºया सेगमेंट निर्मितीचे काम नाशिक फाटा उड्डाणपुलाजवळील पिंपळे गुरव येथील कास्टिंग यार्डात सुरू आहे. येथे तीन हजार १२३ सेगमेंटची निर्मिती केली जाणार आहे. मात्र, सध्या कास्टिंग यार्डमधील निर्माण होणारा काँक्रीटचा शिल्लक माल व राडारोडा कासारवाडीच्या बाजूने गणपती विसर्जन घाटासमोरील पवना नदीकडेला थेट टाकून दिला जात आहे.नदीपात्रात राजरोसपणे राडारोडा टाकण्याचा उद्योग सुरू असताना प्रशासन याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे काही ठिकाणी सपाटीकरण करून बांधकामदेखील केलेले आहे. नदीप्रदूषण रोखण्यासाठी विविध संस्था, संघटनादेखील वारंवार पाठपुरावा करीत असतात. उत्स्फूर्तपणे आठवड्यातील एक किंवा दोन दिवस नदी स्वच्छतेसाठी काम करणारे अनेक स्वयंसेवक आहेत. दोन दिवसांपूर्वीच चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्यात आली. कास्टिंग यार्डातील कोणतेही साहित्य बाहेर जाऊ नये यासाठी यार्डच्या कडेने पत्र्याचे कुंपण लावण्यात आले आहे. मात्र, ठेकेदाराच्या कामगारांनी कुंपणासाठी लावलेले पत्रे काढून येथील राडारोडा नदीपात्रालगत टाकला.तपासणी झालेल्या रिलीज टेस्ट ट्युबचे साहित्य ठेकेदाराच्या कामगारांनी यार्डाच्या कुंपणाबाहेर टाकले होते. त्यामुळे हे साहित्य नदीपात्रात गेले. मंगळवारी ते हटविण्यात आले. पत्र्याचे कुंपण लावण्यात येणार आहे. अशाप्रकारे राडारोडा टाकल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.- गौतम बिºहाडे, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, रिच वन, पुणे मेट्रो

टॅग्स :Metroमेट्रोpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड